BMC election winners list Sarkarnama
मुंबई

BMC Election : मुंबईच्या महापौरपदाबाबत मोठी अपडेट; निवड लांबणीवर पडण्याचे 'हे' आहे नेमके कारण

BJP Shiv Sena alliance News : राज्यातील 29 महापालिकेचे निवडणूक लागले तर महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीतील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील 29 महापालिकेचे निवडणूक लागले तर महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीतील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यानंतरही महापौर पदावरून भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अद्यापही कोकण आयुक्तांकडे गटाची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे आता हा कार्यक्रम पुढे ढकलला जाण्याची शक्यता असून नवीन महापौरांची निवड व्हायला फेब्रुवारी महिना उजडणार असल्याचे दिसते.

मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपचे 89 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 जण विजयी झाले तर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे 65 तर मनसेचे 7 काँग्रेसचे 23 जण विजयी झाले आहेत. महायुतीमधील दोन्ही पक्ष मिळून 118 संख्याबळ झाले आहे. त्यामुळे लवकरच महापौरपदाची निवडणूक होईल, असे वाटत असताना महापौर पदावरून भाजप (BJP) व शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याने निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आरक्षण सोडतीत मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे अनेक महिला महापौरपदासाठी उत्सुक आहेत. महापौर पदाच्या निवडीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. त्यातच आता महापौरपदाची निवड ही आणखी लांबणीवर पडू शकते, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. या महिनाअखेर महापौरांची निवड होणार होती, मात्र भाजप आणि शिवसेनेने (Shivsena) अद्यापही कोकण आयुक्तांकडे गटाची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे आता हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे नव्या महापौरांची निवड व्हायला फेब्रुवारी महिना उजाडेल असे दिसत आहे.

मुंबईचे महापौरपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अडीच वर्षांसाठी मिळावे, असा आग्रह धरला आहे. पण यासंदर्भात कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. यंदा भाजपनं शिवसेनेपेक्षा तिप्पट जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला पहिल्यांदाच उपमहापौरपदावर समाधान मानावे लागणार असल्याचे दिसत आहे. महापौरपद आपल्याकडे ठेवण्यावर भाजप ठाम आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कालावधीत महापौरपद आपल्याकडे असावे, अशी शिवसेनेची इच्छा होती. त्यांनी यासंदर्भात मागणी करुन पाहिली, पण भाजपने ही मागणी अमान्य केली असल्याचे समजते.

दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सवाल विचारण्यात आला असता त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची गटस्थापना झाली नाही. गट स्थापना बहुतेक घटस्थापनेपर्यंत होईल, असा टोला राऊत यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT