Worli hit and run case Sarkarnama
मुंबई

Worli hit and run case : मुंबई ‘हिट अँड रन’ प्रकरण; बाप श्रीमंत अन् शिंदे शिवसेनेशी संबंध, मुलाला काही काळ आतच राहू द्या!

Mumbai Worli Hit-and-Run: Supreme Court Rejects Bail of Accused Mihir Shah : मुंबई 2024 मध्ये झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणात एकनाथ शिंदे शिवसेना माजी नेत्याचा मुलाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Pradeep Pendhare

Mihir Shah bail rejected : मुंबईत 2024 मध्ये बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माजी नेत्याचा मुलगा मिहीर शहा याचा जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवले.

'बाप श्रीमंत अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची संबंधित आहे. अपघात करतो अन् पसार होतो. त्याला काही काळ आतच राहू द्या. या मुलांना धडा शिकवायलाच हवा,' असे निरीक्षण नोंदवत, जामीन याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारण्याचा निर्णय कायम राहिला.

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने जामीन याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवले. आरोपी श्रीमंत कुटुंबातील असून, त्याचे वडील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) पक्षाशी संबंधित आहे, ही बाब न्यायालयाने गांभीर्याने लक्षात घेतली. "हा मुलगा आपली ‘मर्सिडीज’ शेडमध्ये उभी करतो, ‘बीएमडब्ल्यू’ काढतो, अपघात करून पसार होतो. त्याला काही काळ आतच राहू द्या. या मुलांना धडा शिकवायलाच हवा,” असे जामीन याचिकेवर गंभीर निरीक्षण नोंदवले.

मिहीर शहाच्यावतीने हजर असलेले ज्येष्ठ वकील रेबेका जॉन यांनी या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर उच्च न्यायालयाने (Court) जामीन अर्ज करण्याची मुभाकडे लक्ष वेधले. मात्र, न्यायालयाचा कल ओळखून त्यांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली आणि न्यायालयाने ती देखील मंजूर केली.

मिहीर शहा (वय 24) याला गेल्या वर्षी 9 जुलैला अटक करण्यात आली होती. त्याआधी दोन दिवस त्याने मुंबईतील वरळी परिसरात आपल्या ‘बीएमडब्ल्यू’ कारने दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे. या अपघातात कावेरी नखवा (वय 45) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रदीप नखवा जखमी झाले.

आरोपी मिहीर शहा याने अपघातानंतर ‘बांद्रा-वरळी सी लिंक’कडे वेगात पलायन केल्याचे सांगितले जाते. त्या वेळी महिला कारच्या बोनेटवर अडकलेली होती आणि नंतर सुमारे दीड किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कारच्या चाकांमध्ये अडकत ओढली गेली.

अपघाताच्या वेळी या मोटारीत उपस्थित शहाचा चालक राजऋषी बिडावत यालाही त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. दारूच्या नशेत असताना स्कूटरला धडक दिल्यानंतरही कार न थांबवता पीडितेला वाहनाखाली ओढत नेल्याची नोंद घेत 21 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारला होता. त्या आदेशालाच मिहीर शहा याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT