Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Narendra Modi : मोदींची हटके स्टाईलमध्ये 'एन्ट्री...' मुंबईतील कार्यक्रमात नेमकं काय झालं ?

Jui Jadhav

Mumbai Political News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू सागरी मार्गाचे उद्घाटन झालं. नाशिकमध्ये सर्वप्रथम मोदी यांनी उपस्थिती लावली. तिथेदेखील त्यांनी सभास्थळी जाण्यासाठी रोड शो केला. नवी मुंबईतदेखील सभास्थळापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच हटके स्वागत झालं.

टेम्पोमधून एन्ट्री

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोड शो पार पडला. यानंतर मुंबईतील उलवे जिथे नरेंद्र मोदी यांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन झाले, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची हटके एन्ट्री झाली. एका छोट्या चारचाकी गाडीवर छोटा प्लॅटफॉर्ममागे एका रथासारखा लावला होता. हा रथ फुलांनी सजवला होता.

या रथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. हा रथ थेट सभास्थळाच्या एन्ट्री गेटपासून ते स्टेजपर्यंत पोहोचला. या रथाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पचे उद्घाटन

शिवडी-न्हावाशेवा समुद्री मार्गाचं लोकार्पण जो मुंबई-नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. २ हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन, खारकोपर ते उरण रेल्वेसेवेचं मोदींकडून उद्घाटन करण्यात आलं.

ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन, बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गाचे औपचारिक लोकार्पणदेखील करण्यात आलं. ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह भूमिगत मार्गाचं भूमिपूजन, पालघरसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा शुभारंभ झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सीप्झ सेझमधल्या भारतरत्नम सेंटरचं उद्घाटन, सीप्झ सेझमध्ये जेम्स, ज्वेलरीनिर्मिती केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. नमो महिला सशक्तीकरण योजनेचं उद्घाटनदेखील आज करण्यात आलं.

मोदी हैं तो मुमकिन हैं...

नाशिकमध्ये युवा महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषण केलं. त्यावेळी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत 'मोदी हैं तो मुमकिन हैं'चा नारा लावला. अनेक विकासकामांना चालना मिळाली. पुढील काळातही मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामं होतील,' असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT