Municipal elections Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या प्रभाग रचनेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व असल्याचा आरोप होत आहे. थेट रहिवाशी भाग असलेले विभाग तोडण्यात आल्यानं प्रभागचोरी झाली रे, अशी बोंब भाजपच्या माजी नगरसेवकांनी बोंब ठोकण्यास सुरवात केली आहे.
भाजपच्या 24 माजी नगरसेवकांना प्रभाग रचनेचा थेट फटका बसला आहे. यामुळे भाजप मंत्री गणेश नाईक देखील आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानिमित्ताने मंत्री नाईकांना यानिमित्ताने थेट आव्हानच दिलं आहे. शिंदेंनी थेट नाईकांना त्यांच्या होमग्राऊंडवर नवी मुंबईत घेरल्यानं भाजपनं देखील संताप सुरू केला आहे.
नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिकेत 111 नगरसेवक निवडण्यासाठी 28 प्रभाग असणार आहेत. यासाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. परंतु प्रभाग रचनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व दिसत असल्याचे आरोप होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसकडून आक्षेप घेतले जात आहेत. प्रभाग रचनेवर हरकती घेण्यासाठी चार सप्टेंबर शेवटची तारीख असल्यानं हरकतींचा पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चुकीच्या पध्दतीने प्रभाग रचना करून एकसंघ असलेला रहिवाशी विभाग तोडण्यात आले आहेत. मतदार याद्यांचा घोळ सुरू असतानाच, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी, विशेष करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रभाग रचनेतही सोय पहिली आहे. प्रभाग रचनेत घेतलेल्या आक्षेपांवर सुधारणा न केल्यास जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा शिवसेना (Shivsena) ठाकरे सेना पक्षाचे उपशहरप्रमुख समीर बागवान यांनी दिला आहे.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सोयीची प्रभाग रचना केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी लावून धरला आहे. भाजप वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा प्रभाग रचनेवर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रभाग रचनेवरून एकनाथ शिंदेविरुद्ध गणेश नाईक, असा संघर्ष अधिक पेटला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांच्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आले आहेत. भाजपच्या 24 माजी नगरसेवकांचा या प्रभाग रचनेतील बदलाचा फटका बसला आहे.
प्रभाग रचनेच्या माध्यमातून भाजपच्या गणेश नाईक यांना धक्का देण्याचा प्रयत्न आहे. यात भाजपच्या माजी नगरसेवकांचे काही प्रभाग तोडण्याचे काम झाले आहे. प्रभाग रचनेवरून मंत्री गणेश नाईक यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलवली आहे.
मतचोरीपूर्वी प्रभागचोरी झाल्याची चर्चेने जोर पकडला आहे. प्रभाग रचनांचा तपशील व नकाशे यांचा ताळमेळ जुळत नाही. प्रभाग रचनेत भौगोलिक समतोल साधलेला नाही. यामुळे प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस पडणार असे संकेत आहेत.
निवडणूक विभागाच्या प्रभाग रचनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. प्रभागांची रचना करताना भौगोलिक समतोल साधण्यात यावा अशी अपेक्षा असते. रचनांमध्ये अनेक प्रभागांचा भूगोल बदलला आहे. प्रभागांच्या अधिसुचनेमधील परिसर गृहत धरला तर, गावांमध्येही नकाशामधील रचना वेगळी दर्शवते. यामुळे इच्छुक उमेदवारांचा गोंधळ उडाला आहे. प्रभाग रचनेवर चार सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. कार्यकर्त्यांमधील नाराजी पाहता यावेळेस हरकतींचा पूर येणार, हे स्पष्ट दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.