Baba Siddque  Sarkarnama
मुंबई

Baba Siddque : मुंबई हादरली! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या

Deepak Kulkarni

Mumbai News : माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.वांद्रे पूर्व परिसरात ही घटना घडली आहे. शनिवारी (ता. 12) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला.

बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर तीन ते चार राऊंड फायर करण्यात आले होते.या गोळीबारात त्यांच्या छातीला लागल्याची माहिती समोर येत आहे.पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना धमकी मिळाली होती. बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर गोळीबार झाला आणि याच गोळीबारात त्यांची हत्या झाली. 

मुंबईतील काँग्रेसच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांपैकी ओळखले जाणाऱ्या बाबा सिद्दीकी यांनी 8 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटामध्ये प्रवेश केला होता. सिद्दीकी हे सुमारे 48 वर्ष काँग्रेस पक्षासोबत होते. ते सलग तीनवेळा वांद्रे पूर्व या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. ते आघाडी सरकारच्या काळात माजी राज्यमंत्रीही होते. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळाबारीच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय.

निर्मल नगर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बाबा सिद्धीचे हे काँग्रेसचे नेते होते. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला होता. मुंबईमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली होती.

बाबा सिद्दीकी यांचे राजकीय क्षेत्रासह बॉलिवूडच्या अभिनेत्यांशीही जवळचे संबंध राहिले होते. त्यांची इफ्तार पार्टीचीही खूप मोठी चर्चा होत असत. सेलिब्रेटींची मोठी गर्दी सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला होत होती.

सिद्दीकी यांनी 1977 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 1988 मध्ये ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. चार वर्षांनंतर त्यांची मुंबई महानगरपालिकेत नगरपरिषद म्हणून निवड झाली आणि पाच वर्षांनंतर त्यांची पुन्हा या पदावर निवड झाली करण्यात आली होती.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT