- जुई जाधव
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी त्यांनी शिवडी - न्हावा शेवा सेतू मार्गाची देखील पाहणी केली. यावेळी पत्रकरांशी संवाद साधतांना त्यांनी विरोधकांना टोला देखील लगावला. विरोधकांना काही काम उरलं नाही, कुठल्याही विषयावर टीका करणं हेच त्यांना जमतं, असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.
शिवडी - न्हावा शेवा मार्गावर 250 रुपये टोल लागू करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला हा मार्ग टोलमुक्त करावा, अशी मागणी देखील केली. सरकारने निवडणुका लक्षात घेत हा निर्णय घेतला, अशीही टीका केली. मात्र आम्ही कोणतेही निर्णय निवडणुकीच्या अनुषंगाने घेतले नाहीत. अडीच वर्ष सगळे प्रकल्प बंद होते ते आम्ही सुरु केले.
त्यांनी अडीच वर्षात जी घाण केली आहे. ती आम्ही साफ करत आहोत, असा टोला मुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला.
मुख्यमंत्र्यांनी राबविली स्वच्छता मोहीम...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळपासून मुंबईतील काही भागात स्वच्छता मोहीम राबविली. त्यांनी रस्ते साफ केले, डीप क्लीन ड्राइव्हचं आयोजन केलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री हे सध्या काही महिन्यांपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात सक्रिय झाले आहेत. मुंबईतील रस्ते, नाले आणि समुद्र किनारे साफ करण्यासाठी ते स्वतः मैदानात उतरले आहेत. मुंबईत काही महिन्यांपूर्वी हवेची गुणवत्ता खूप ढसाळली होती, त्यामुळे स्वच्छतेच महत्व लोकांना पटवून देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री 'ॲक्शन मोड'वर आले आहेत.
नरेंद्र मोदी आमचे नेते...
महाविकास आघाडीमध्ये मुख्य नेता कोण ? हे अजून स्पष्ट झालेल नाही. आमचे नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांना त्यांचं उद्देश काय आहे, हेच माहित आहे नाही अशी टीका देखील त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी अनेक विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. मुंबईतील अनेक विकासकामे आहेत जी सुरु केली जाणार आहेत.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अनेक वेळेला ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. मुंबईतील प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तरी देखील केवळ उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. यामुळे मुंबईकरांना वेठीस ठेवलं जात आहे. मात्र, आता या विकासकामांच उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.