Pratibha Padhye Entry Bahujan Vikas Aaghadi  sarkarnama
मुंबई

Palghar Loksabha : 'बविआ'चा भाजपला दे धक्का! प्रतिभा पाध्येंचा पक्षप्रवेश

संदिप पंडित

Loksabha Election : पालघर लोकसभा निवडणुकीचा भाजप उमेदवार जाहीर झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. बहुजन विकास आघाडीकडून आमदार राजेंद्र पाटील निवडून रिंगणात आहेत. याच पार्श्वभूमीवर बविआने भाजपला दे धक्का दिला आहे. भाजपच्या BJP प्रदेश मच्छीमार सेलच्या प्रदेश सेक्रेटरी प्रतिभा पाध्ये-वैती यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला.

पालघर लोकसभा Palgar Loksabha निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) वसई पूर्वेकडील भाजपच्या नेत्या आणि प्रदेश मच्छीमार सेलच्या सेक्रेटरी ठाणे पालघर जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा पाध्ये वैती यांनी बहुजन विकास आघाडीत BVA प्रवेश केला.

त्यांच्या सोबत हिंदू सेवा संघाचे सुरेश माकिजा,समाजसेवा संसदेचे कैलास जाधव, लक्ष्मीबाई महिला मंडळ आणि नारी सशक्तीकरण संघटनेच्या महिलांनी ही बबिआमध्ये प्रवेश केला. प्रवेशा वेळी माजी महापौर नारायण मानकर,माजी नगराध्यक्ष मुकेश सावे , माजी नगरसेवक महेश पाटील , प्रकाश वनमाळी आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रतिभा पाध्ये यांनी सांगितले की, मी गेली 11 वर्षे भाजपचे काम पाहत होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासोबत ठाणे आणि पालघर मध्ये काम केले आहे.पालघरच्या विकासाचे व्हिजन हे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे असल्याने आणि त्यांच्या कामाची पद्धत आवडल्याने बविआ मध्ये प्रवेश करत आहे. मी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता हा प्रवेश करत असल्याचे प्रतिभा पाध्ये यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT