Devendra fadnavis News : देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना फटकारले, 'संभाजीराजेंचा 'तो' अपमानच'

Kolhapur Loksabha : लोकांनी देशांमध्ये नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्याचे मन बनवले आहे. संजय मंडलिक यांना खासदार बनवण्याचे नागरिकांनी ठरवले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Kolhapur Political News : कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ठाकरे गट देखील शाहू महाराजांना मत देण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, महायुतीकडून शाहू महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचा राज्यसभा निवडणुकीच्या वेळी अवमान महाविकास आघाडीकडून Mahavikas Aghadi करण्यात आल्याचा मुद्दा केंद्रस्थानी आणत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावर वरून महाविकास आघाडीला घेरले आहे.

Devendra Fadnavis
Sharad Pawar News : 'भेटून, फोनवर आणि खासगीत काय करायचं ते केलंय'; शरद पवारांनी टाकली गुगली

'संभाजीराजे यांचा 100 टक्के राज्यसभेच्या निवडणुकी वेळी अवमान केला. संभाजीराजे Sambhaji Raje यांना अटी आणि नियम घालून लिहून घेणे हे चुकीचे. सामान्य माणसाला देखील असं कोणी अटी आणि शर्ती घालत नाही. एकीकडे छत्रपती घराण्याचा सन्मान दाखवायचा आणि दुसरीकडे असे लिहून घेणे हे चुकीचे.', अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ते कोल्हापुरातील चंदगड येथे बोलत होते.

लोकांनी देशांमध्ये नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्याचे मन बनवले आहे. संजय मंडलिक यांना खासदार बनवण्याचे नागरिकांनी ठरवले आहे. देशासमोरचे नाही तर त्यांच्या पक्षासमोरचे नरेंद्र मोदी हे संकट आहेत.

अजितदादा आमच्या सोबत आहेत. त्यामुळे नक्कीच शरद पवार यांच्यासमोर नरेंद्र मोदी यांचे संकट आहे. जनता याचे उत्तर मतपेटीतून देईल. राजकारणात पक्ष वेगवेगळे असू शकतात मात्र अडचणीच्या काळात आजारपणाच्या काळात विचारपूस करणे मदत करणे ही आपली संस्कृती आहे. नरेंद्र मोदी हे नेहमी पाळतात. नरेंद्र मोदी हे त्या काळात नियमितपणे उद्धव ठाकरे यांची फोन करून विचारपूस करत होते. असेही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीतून प्रतिक्रिया दिलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

ही लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायची याची निवडणूक आहे. देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो. ते आव्हान पेलणारी निवडणूक आहे. हे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी निवडणूक आहे. समोर इंडिया आघाडी आणि राहुल गांधी यांच्याकडे 26 पक्षाची खिचडी आहे. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

इंडिया आघाडीकडे डब्बे नाही. प्रत्येकजन स्वतःला इंजिन समजत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यात आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांच्या इंजिनमध्ये सुप्रिया ताईंना जागा आहे. पण पंतप्रधान मोदी यांच्या इंजिन मध्ये सर्वसामान्यांना जागा आहे. विकासाचे इंजन पंतप्रधान मोदी यांनी जोडले आहे. 60 कोटी पेक्षा जास्त लोक स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. अनेक महिलांना मुद्रा योजनेतून 80 लाख महिलांना लाभ मिळाला. महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

काजू बोर्ड तयार करण्याचा निर्णय

चंदगड मधील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बोर्ड तयार करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिला आहे. महायुतीचे सरकार जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करत आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला मदत केली म्हणूनच फ्लायओव्हर, रेल्वे, पूल, विमानतळ झाले. त्यामुळे महायुतीला आशीर्वाद द्या असे आवाहन फडणवीस यांनी केले.

(Edited By Roshan More)

Devendra Fadnavis
Brij Bhushan Singh : मोठी बातमी! महिला कुस्तीपटूचं प्रकरण ब्रिजभूषण सिंहांना भोवलं; भाजपनं तिकीट कापलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com