Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : फडणवीसांच्या गैरहजेरीत अजितदादा अन्‌ एकनाथ शिंदेंची राजकीय चर्चा, शिवसेना नेत्याचा दुजोरा

Mahayuti Political strategy : गणेशोत्सवामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वर्षा बंगल्यावर गेले होते. त्या भेटीत राजकीय बोलणी आणि चर्चाही झाली. पण....

Vijaykumar Dudhale

Mumbai, 12 September : उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर राजकीय चर्चा झाली आहे. या बैठकीचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी समर्थनही केले आहे.

अजितदादांच्या (Ajit Pawar) अनुपस्थितीत शिंदे-फडणवीसांच्याही बैठका झाल्या आहेत, असेही शिरसाट यांनी या वेळी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गैरहजेरीत झालेल्या शिंदे-पवारांच्या भेटीला मात्र महत्व आहे. त्यातून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

गणेशोत्सवामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्याकडे वर्षा बंगल्यावर गेले होते. त्या भेटीत राजकीय बोलणी आणि चर्चाही झाली. पण , त्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली, हे फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादाच सांगू शकतात. त्याची बाहेर कोठेही वाच्यता झालेली नाही, असू सांगून संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील भेटीतील चर्चा मात्र गुप्तच ठेवली.

ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीप्रमाणे अजित पवार गटाने किती जागा लढवाव्यात, त्यांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांची अपेक्षा कुठपर्यंत आहे, हे कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतलं असावं. चर्चेतून मार्ग काढायची भूमिका अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची असू शकते.

भाजपच्या अनुपस्थितीत वगैरे बैठक झाली, असं काही नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अनेक वेळा एकत्र येतात. म्हणून काय आम्हाला अजितदादा नकोत, असा त्याचा अर्थ होत नाही. जशी वेळ येते, त्या त्या वेळेनुसार अशा बैठका होत असतात. आता अजितदादा भेटले आहेत. येत्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही भेटू शकतात, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

जेव्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांमध्ये एकत्रित बैठका होतील, तेव्हा जागा वाटपांवर निर्णय होईल. या बैठकीमुळे वेगळी समीकरणे वगैरे तयार होण्याचा प्रश्नच येत नाही. महायुती म्हणून मी तिघे एकत्रितपणे आणि भक्कमपणे निवडणूक लढवणार आहोत. महायुतीकडे जनतेचा कौलसुद्धा चांगला दिसून येत आहे, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला.

संजय शिरसाट म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा चर्चा तर होणारच ना. अजित पवार किती जागा लढवणार, याविषयी चर्चा केली असेल. या चर्चेतून काही चांगल होईल म्हणून चर्चा झाली पाहिजे. चर्चेतून मार्ग काढायची भूमिका अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT