pradip purnekar  Sarkarnama
मुंबई

Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट; क्राईम ब्रँचकडून तीन महिला ताब्यात, महत्त्वाचे धागेदोरे हाती

Thane Crime Branch latest action News : या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून ठाणे क्राईम ब्रँचकडून तीन महिला ताब्यात घेतले असून त्याशिवाय या प्रकरणाच्या तपासासाठी आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

Sachin Waghmare

Thane News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर ठाण्यातील वातावरण तापले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्यानंतर प्रमुख आरोपींच्या अटकेसाठी बुधवारी रात्री उशीरपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेऊन कुटुंबीय व शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले.

त्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील ठाण्यातील पोलीस ठाण्यात बसले होते. त्यानंतर पोलिसांनी पुरवणी जबाबात आणखी काही आरोपींची नावे समाविष्ट केली आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून ठाणे क्राईम ब्रँचकडून तीन महिला ताब्यात घेतले असून त्याशिवाय या प्रकरणाच्या तपासासाठी आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

प्रदिप पुर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात ⁠ठाणे क्राईम ब्रँचने गुरुवारी मोठी कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी मिरारोड परिसरातून तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. ⁠मुख्य हल्लेखोर हत्येआधी आणि हत्येनंतर या तीन महिलांच्या संपर्कात असल्याचे पुढे आले आहे. ⁠संतोष कनोजिया आणि या महिलांमध्ये हत्येनंतर पैशाची देवाण घेवाण झाल्याचे तपासात आले समोर आले आहे. या हत्या प्रकरणी पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून त्यामुळे या तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे.

दरम्यान, ठाण्यातील सेनेचे (Shivsena) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील वातावरण तापले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. त्यातच आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने आता एसआयटीची स्थापना केली आहे.

येत्या काळात या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडून केला जाणार आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पप्या शिंदे या आरोपीची ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने कसून चौकशी केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)हे बुधवारी ठाण्यात गेले होते. या दोघांनीही पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केले. राम पूर्णेकर आणि पोलीस आयुक्तांशी या दोघांनी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर काल घडलेल्या या घटनेची माहिती संजय राऊत यांनी मुंबईत मीडियाला देताना सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT