

Thane News: ठाण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनांनी डोकं वर काढलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी (ता.29 सप्टेंबर)रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून अन् तीक्ष्ण हत्यारांनी वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पूर्णेकर यांचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला असून राजकीय वातावरण तापलं आहे. याचदरम्यान,पूर्णेकरांचा सीटी स्कॅन रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांना निर्घृणपणे संपवण्यात आलं आहे. त्यांच्या मृत्यूमुळे ठाण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला असून पूर्णेकर कुटुंबियांसह शिवसैनिकांनी मोठ्या गर्दीसह पोलिस स्टेशनच्या बाहेरच मृतदेह आणत ठिय्या मांडून बसले आहेत. तसेच या हत्येमागचे सूत्रधार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत असल्याचा आरोपही ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी केला आहे.
याचदरम्यान, प्रदीप पूर्णेकरांना या हल्ल्यानंतर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचं सीटी स्कॅन करण्यात आलं होतं. याच सीटी स्कॅन रिपोर्टमधून आता काही धक्कादायक बाबी समोर आली आहे. त्यात पूर्णेकर यांच्यावर भयानक हल्ला करण्यात आला असून आरोपींनी त्यांच्यावर झाडलेल्या सातपैकी चार गोळ्या प्रदीप पूर्णेकरांना लागल्याचं समोर आलं आहे.
एक गोळी त्यांच्या मानेतून आरपार गेली तर एक गोळी त्यांच्या छातीमध्ये अडकून राहिली होती असं सीटी स्कॅन रिपोर्टमधून उघडकीस आलं आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्राथमिक अंदाज वर्तवताना या हत्येमागेचं कारण राजकीय असल्याचं म्हटलं आहे. हा सीसीटीव्ही व्हिडिओ एका मेडिकल दुकानाचा आहे. या व्हिडिओमध्ये गोळीबारानंतर स्थानिक नागरिक प्रदीप पुर्णेकर यांना रुग्णालयात देताना दिसत आहेत.
ठाणे जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकऱणात पोलिसांनी पूर्णेकरांचा जुना मित्र पप्या शिंदे याला अटक केली आहे. मात्र, अद्यापही या घटनेतील चार आरोपी फरार असल्यानं पोलिसांवरचा आरोपींच्या अटकेसाठीचा दबाव वाढला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी टीम रवाना करण्यात आल्या आहेत.
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी(ता.30) मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक ठाण्यातील त्यांच्या पक्षाचे विभागप्रमुख पूर्णेकर यांची हत्या करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आहे. तसेच आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत हेही ठाण्याच्या जाऊन पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.