Pradeep Purnekar Murder: प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणात ठाकरे अन् राऊतांचे गंभीर आरोप; मीनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Thane Shivsena Pradeep Purnekar : आमदार आदित्य ठाकरे अन् खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात जात पूर्णेकर हत्येप्रकरणात पुरवणी जबाबात ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे या दोघांची नावे FIR मध्ये घ्या,नातेवाईक पुरावे देत आहेत. गुन्हेगारासोबत राजेंद्र शिंदे याचे फोटो आहेत,असं पोलिसांसमोर ठणकावलं होतं. आता राऊतांच्या आरोपांवर मिनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Minakshi Shinde Pradeep Purnekar murder case .jpg
Minakshi Shinde Pradeep Purnekar murder case .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणानंतर ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याचदरम्यान,आमदार आदित्य ठाकरे अन् खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात जात पूर्णेकर हत्येप्रकरणात पुरवणी जबाबात ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे या दोघांची नावे FIR मध्ये घ्या,नातेवाईक पुरावे देत आहेत. गुन्हेगारासोबत राजेंद्र शिंदे याचे फोटो आहेत,असं पोलिसांसमोर ठणकावलं होतं. आता राऊतांच्या आरोपांवर मिनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे यांनी बुधवारी (ता.30)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणातील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्या म्हणाल्या, ही माझ्या प्रभागामध्ये झालेली ही घटना दुर्दैवी आहे. खरंतर कुणीही येऊन पूर्णेकर हत्येप्रकरणात माझं नाव टाकून मला गोवण्याचा प्रयत्न करताय, ही चुकीची बाब आहे. पोलिस याप्रकरणी पुरावे शोधताहेत, चौकशी करताहेत. या चौकशीअंती पोलिस जी काही माहिती आहे, ते देतील, असंही शिंदे म्हणाल्या.

आदित्य ठाकरेंनी पोलिसांशी चर्चा करताना मीनाक्षी शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात प्रदीप पूर्णेकरांना काळात बघून घेईन अशी धमकी दिल्याचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहे. तसेच या हत्येचा त्या धमकीशी संबंध जोडला होता. आता ठाकरेंच्या याच आरोपांवर शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या, गेली 20 वर्षांपासून मी राजकारण करत आहे. निवडणुकीवेळी आमच्या प्रभागात प्रचंड गोंधळ सुरू होता. त्यावेळी मी बोललेलं बघून घेईन हे वाक्य जर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे या घटनेशी जोडत असतील, तर ही दुर्दैवी बाब असल्याची टीकाही मीनाक्षी शिंदे यांनी केली.

शिंदे म्हणाल्या,“माझ्या घरी कट शिजला असं जर ते म्हणत असतील तर माझ्या घरी ते कधी होते, किंवा त्यांनी कधी याबद्दल माझ्या घरात बघितलं याचा पुरावा त्यांना द्यावा लागेल ना. बोलायचं म्हणून काहीही बोलायचं.सध्या लोकांचा रोष आहे.कारण की त्या घरातला मुलगा गेला आहे. त्या रागामध्ये ते बोलत असतील असंही त्यांनी सांगितलं.

Minakshi Shinde Pradeep Purnekar murder case .jpg
Gokul Politics: 'गोकुळ'चा प्लॅन ठरला? मुख्यमंत्री फडणवीस अन् मंत्री मुश्रीफांची गुप्त भेट, भाजप अंतर्गत 'अदृश्य' विरुद्ध 'गूढ' शक्ती अ‍ॅक्टिव्ह

मात्र, अशाप्रकारचे आरोप करण्यापूर्वी आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांनी विचार केला पाहिजे. प्रत्येकवेळी काहीही झालं की, शिंदे गटातील मिनाक्षी शिंदे किंवा यांचं नाव वापरुन राजकारण करायचं, ही दुर्देवी आणि चुकीची बाब असल्याचं सांगतानाच पोलिसांनी चौकशीला बोलावलं, तर जाणार असल्याची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

मिनाक्षी शिंदे यांनी जरी माझे बऱ्याच लोकांसोबत वैचारिक मतभेद असले तरी कोणाला जीवे मारण्याची परिस्थिती माझ्यावर आलेली नाही, असं स्पष्ट केलं आहे. यावर कोणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे. वैचारिक मतभेद होते. मात्र, असे कृत्य माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबाकडून कधीच घडणार नाही, पण काहीजण याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Minakshi Shinde Pradeep Purnekar murder case .jpg
Pradip Purnekar News: प्रदीप पूर्णेकरांची हत्या, हादरवणाऱ्या CCTV फुटेजनंतर आता 'सीटी स्कॅन' रिपोर्ट समोर; एक गोळी मानेतून आरपार तर एक...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पोलिसांची भेट घेतल्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोपींची नावे पुरवणी जबाबात घेण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणाचे मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे मुख्य सूत्रधार आहेत, सूत्रधार दोन जण आहेत, कधी कारवाई होणार. आम्हाला चौकशीसाठी कधीही बोलवा, पण FIR मध्ये ही दोन नावे टाका,असे संजय राऊत यांनी म्हटले.

खासदार संजय राऊत यांनी यावेळी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपींना तत्काळ अटक करा, ही हत्या उद्धव ठाकरे यांनी अत्यंत सिरियसली घेतली आहे. एका शिवसैनिकाची हत्या आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांच्या स्टँडिग कमिटीवर आहे, मला कायदा माहीत आहे. त्यामुळे संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी अशी मागणी राऊतांनी केली होता.

Minakshi Shinde Pradeep Purnekar murder case .jpg
Palghar Hospital Case : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे शिंदेंच्या आमदारपुत्राला दणका! डॉक्टर मारहाणप्रकरणात सहा जणांचे जामीन रद्द

यावेळी खासदार संजय राऊतांनी राजेंद्र शिंदे, मिनाक्षी शिंदेंना पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणात आरोपी करा अशी आग्रही भूमिका पोलिसांसमोर मांडली. तसेच प्रदीप पूर्णेकर यांना ठार मारणारे हे कॉन्ट्रॅक किलर आहेत, मुख्य किलर बाहेर आहेत. आरोपींना पोलिसांसमोर काहीही बोलायचं नाही, सहा महिने जेलमध्ये राहा, नंतर तुला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असा शब्द त्यांना दिला जातो, असंही राऊत यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com