Praful Patel Sarkarnama
मुंबई

Praful Patel : अपात्रतेच्या भीतीतून राज्यसभेचा अर्ज भरला...; काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी आपला अर्ज दाखल केला. राज्यसभेची टर्म सुरू असतानाही पटेलांनी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात होते. यावर ही बाब तुमच्यासाठी आश्चर्यकारक असेल, आमच्यासाठी नाही. माझ्या जागी दुसरे कुणीतरी येईल, असे सांगत याचा आणि अपात्रतेच्या निकालाचा काही संबंध नसल्याचेही पटेलांनी स्पष्ट केले.

अर्ज भरल्यानंतर पटेलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी पटेल (Praful Patel) म्हणाले, राज्यसभेवर पूर्वीही होतो, टर्म चालू असतानाही फॉर्म भरला. त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काही गोष्टी गुलदस्तात राहू द्या. राजकारणात काही ना काही घडामोडी कराव्या लागतात. येणारा काळ स्पष्ट करेल, की आज फॉर्म का भरला ते. मी राज्यसभेचा फॉर्म भरण्याचा आणि अपात्रतेच्या निकालाचा काही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी कधीही कुणीही राज्यसभेची (Rajya Sabha) टर्म सुरू असताना, तेही चार वर्षांहून अधिक कार्यकाळ बाकी असताना फॉर्म भरला नाही. यावर पटेलांना छेडले असता त्यांनी राज्यात आणि देशात अनेक घटना पहिल्यांदाच घडल्याचे सांगितले.

ते म्हणाले, देशात आता नवे असे काही नाही घडले. राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit pawar) अजितदादांकडे आलेला आहे. त्यामुळे याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दाखल याचिकेनुसार आमच्यावरील अपात्रतेचा काहीही विषय नाही. ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. तसेच माझी रिक्त झालेली जागा आमच्याकडेच राहणार आहे, असा दावाही पटेलांनी केला.

मी अर्ज दाखल केल्याने कुणावरही अन्याय झालेला नाही, असेही पटेलांनी या वेळी सांगितले. एकमताने माझ्या राज्यसभेच्या उमेदवारीवर निर्णय घेतला आहे. राजकीय जीवनात अनेक जण इच्छुक असतात. मात्र, एकाचवेळी अनेकांना संधी देता येत नाही. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तसेच माझ्या रिक्त जागेवर आमचाच अधिकार आहे. त्यावेळी आमच्या पक्षातीलच कुणाला तरी संधी मिळणार आहे, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमची महायुती एकदम घ

'काही गोष्टी गुलदस्तात राहू द्या. राजकारणात काही ना काही घडामोडी कराव्या लागतात. पक्षासाठी चांगले काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वात देशात एनडीएचे पुन्हा सरकार येणार आहे. आता देशभरात आमचे 400 पार खासदार येतील. राज्यातील सर्व्हे दिशाभूल करणारे आहेत. महाराष्ट्रात 45 जागा जिंकून मोदींच्या विजयात राज्याचा मोठा वाटा राहणार आहे, असा विश्वासही पटेलांनी या वेळी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT