Lok Sabha Election 2024 : प्रफुल्ल पटेलांना राज्यसभा, भाजपची बल्ले बल्ले...

Dr. Parinay Fuke : लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री परिणय फुके प्रयत्न करत आहेत.
Dr. Parinay Fuke, Praful Patel and Sunil Mendhe
Dr. Parinay Fuke, Praful Patel and Sunil MendheSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने कार्याध्यक्ष राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकाळ शिल्लक असतानासुद्धा राज्यसभेची उमेदवारी काल बुधवारी (14 फेब्रु) जाहीर केली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा साडेचार वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्यापूर्वीच त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने आता भाजपसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे खासदार सुनील मेंढे यांच्या वर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे. लोकसभा 2024 निवडणुकीचे पडघम काही दिवसांत केव्हाही वाजू शकतात. अशात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण, याची चर्चा मागील दोन महिन्यांपासून सुरू होती. भाजपसह महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने भंडारा-गोंदिया मतदारसंघावर आपली दावेदारी प्रस्थापित केली होती.

सर्वांचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल हे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लागले होते. स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी आठ दिवसांपूर्वीच यावर येत्या दोन दिवसांत निर्णय होईल, असे सांगितले होते. त्यातच आता त्यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा कालावधी शिल्लक असताना त्यांना त्यापूर्वीच पुन्हा उमेदवारी देण्याचे समीकरण अनेकांच्या पचनी पडले नाही. या समीकरणाने मात्र भाजपने सुवर्णमध्य साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Parinay Fuke, Praful Patel and Sunil Mendhe
Dr. Parinay Fuke : फडणवीसांच्या माध्यमातून डॉ. फुकेंनी गोंड-गोवारींच्या अडचणी सोडवल्याच!

खासदार प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर जाणार असल्याने आता भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार राहणार, हे निश्चित झाले. दरम्यान, लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री परिणय फुके प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजप ‘सीटिंग - गेटिंग’ की ‘नवा गडी - नवा राज’ यांपैकी कोणते सूत्र लावते, यावर पुढील समीकरण अवलंबून राहणार आहे.

दुसरीकडे भाजपने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून कुणबी समाजाचा उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. याला भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डसुद्धा हिरवा कंदील दाखविल्याची माहिती आहे. यासाठी भाजपकडून तीन-चार नावांची चर्चा असली, तरी विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री परिणय फुके यांची नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे कुण्या एकाची वर्णी लागणार, हे निश्चित आहे.

येत्या काही दिवसांत भाजपही भंडारा गोंदिया-लोकसभा क्षेत्रावर आपला अधिकृत उमेदवार जाहीर करेल, याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने अद्यापही भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रावर आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. असे असले तरी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांची यादी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.

Edited By : Atul Mehere

R

Dr. Parinay Fuke, Praful Patel and Sunil Mendhe
थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करत झापलं | MP Sunil Mendhe | Gondia Constituency |

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com