Prakash Ambedkar- Raj Thackeray - Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar News : 'लोकसभेनंतर अन् विधानसभेपूर्वी राज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार..' ; आंबेडकरांनी टाकला नवा बॉम्ब

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंची परिस्थिती वाईट झाली तर आम्ही त्यांना मदत करु असं म्हणत त्यांना गाजर दाखवलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ऐनलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही भेट झाल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते.यानंतर राज यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबाही जाहीर केला.

पण याचदरम्यान, त्याचवेळी राज ठाकरे (Raj Thackeray) हे आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख होणार असल्याच्या चर्चांवर थेट भाष्य केले होते. त्यांनी मला जर पक्षप्रमुख व्हायचं असतं तर 2004 झालो असतो. पण माझ्या मनातही तो विचार कधी आला आहे असं स्पष्टीकरण दिले होते. पण आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा करत पुन्हा हा मुद्दा उकरुन काढला आहे.

आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे होऊ शकतात असं मला कुठेतरी जाणवायला लागलं आहे असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे हे मनसे विलीन करुन अध्यक्ष होणार का किंवा शिवसेना पक्षप्रमुख पद हे राज ठाकरे यांच्याकडे जाणार का हे मला जाणवायला लागलं असल्याचं विधान करुन खळबळ उडवून दिली आहे.

'हा' घाट तरी घातला नाही ना!

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे नेहमी त्यांच्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. त्यांच्या दाव्यांची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते. आता त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपच्या धोरणांवर भाष्य केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचा गेमप्लॅन समजून घेतला पाहिजे. मोदी म्हणाले, उद्धव ठाकरेंची परिस्थिती वाईट झाली तर आम्ही त्यांना मदत करु असं म्हणत त्यांनी गाजर दाखवलं आहे. दुसऱ्या बाजूने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना भाजपने प्रचारात घेऊन, हळूवारपणे मेन रजिस्टर्ड अर्थात नोंदणीकृत शिवसेना पक्ष जो एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आहे, ती शिवसेना देण्याचा घाट तर घातला नाही ना असा सवालही आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच राज ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष झाले तर त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अस्तित्वाची चुरस लागेल.त्यात कोण तग धरेल, हे पाहावं लागेल असंही आंबेडकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT