Sharad Pawar Vs Raj Thackeray : शरद पवारांकडून राज ठाकरेंच्या राजकीय अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह

Lok Sabha Election 2024 : पैसे वाटप हे लोकसभा निवडणुकाला कधी ऐकले नव्हते. लोकसभा आणि विधानसभेला पैसे दाखवण्याचे काम आमच्या विरोधकांनी सुरू केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.
Sharad Pawar-Raj Thackeray
Sharad Pawar-Raj ThackeraySarkarnama

Nashik, 16 May : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरे आता महायुतीच्या प्रमुख जागांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

राज ठाकरे यांच्या मुंबईत ज्या सभा होतील, त्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असेल. दरम्यान, शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे महाराष्ट्रातील राजकारणात नक्की काय स्थान आहे, हे मला माहीत नाही, असे म्हणून राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शरद पवारांनी (Sharad Pawar) अगोदर पक्ष फोडले, त्यामुळे त्यांचा पक्ष फुटला आहे, अशी टीका राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ठाण्यातील सभेत केली होती. त्याकडे माध्यमांनी शरद पवार यांचे लक्ष वेधले. त्यावर पवारांनी राज ठाकरेंच्या पक्षाच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सातत्याने नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना असे म्हणत आहे. याचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाबरोबर आहेत, असेही शरद पवार यांनी म्हटले. राज ठाकरे यांच्या टीकेवर बोलताना पवारांनी त्यांच्या पक्षाच्या अस्तित्त्वाविषयी मोठे भाष्य केले.

Sharad Pawar-Raj Thackeray
Shyam Rangeela News : मोदींविरुद्ध निवडणूक लढवण्याचं स्वप्न भंगलं; अर्ज फेटाळल्यानंतर श्याम रंगीला भावूक...

शरद पवार म्हणाले, ‘‘राज ठाकरेंचे महाराष्ट्रातील राजकारणात नक्की काय स्थान आहे, हे मला नाहीत नाही. मी असे ऐकले होते की, नाशिक हा त्यांचा स्ट्राँग बेस आहे. परंतु मला नाशिकमध्ये असे काही दिसत नाही’’.

लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होत आहे, यावर शरद पवार यांनी हे गंभीर आहे. ते म्हणाले, "हे खरं आहे आणि अनुभवलेले देखील आहे. बारामती, सातारा, माढामध्ये पैशाचा वापर बघितला आहे.

पैसे वाटप हे लोकसभा निवडणुकाला कधी ऐकले नव्हते. नगरपालिका निवडणुकांना ऐकले होते. लोकसभा आणि विधानसभेला पैसे दाखवण्याचे काम आमच्या विरोधकांनी सुरू केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.

Sharad Pawar-Raj Thackeray
Maharashtra Political News : इतके सारे होऊनही भाजप पुन्हा पवार, ठाकरे यांचे पक्ष फोडणार? 

महायुतीला पाठिंबा देताना राज ठाकरे काय म्हणाले होते...?

महायुतीला पाठिंबा देताना राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवणारे राज ठाकरे देशातील पहिले व्यक्ती होते. त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांचा विश्वास नसतानाही मोदींनी पंतप्रधान व्हावे, असे राज ठाकरेंनी म्हटले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती राज ठाकरेंनी सभेत दिली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होत होती. राज्यसभा किंवा विधान परिषद नको आहे. आमच्या काही अपेक्षा नाहीत किंवा अटी नाही. मात्र, महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतो, असेही राज ठाकरेंनी सभेत सांगितले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकांची आणि त्यातील चर्चेची माहिती राज ठाकरेंनी सभेत दिली. भेटी व्हायच्या. चर्चा व्हायच्या. मुख्यमंत्री म्हणायचे,'एकत्र काम करू'. पण, ते कसे आणि कधी करायचे, हे मुख्यमंत्री सांगत नव्हते, असेही राज ठाकरे यांनी त्यावेळी सभेत सांगितले होते.

(Edited By : Vijay Dudhale)

Sharad Pawar-Raj Thackeray
Mamata Banerjee: पाचव्या टप्याच्या मतदानापूर्वीचं ममता बॅनर्जींची मोठी घोषणा; इंडिया आघाडीचे सरकार आले तर..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com