Jitendra Awhad, Pratap Sarnaik Sarkarnama
मुंबई

Pratap Sarnaik : महापालिकेच्या अमाप निधीमुळे आव्हाड पुन्हा आमदार; सरनाईकांचा आव्हाडांवर आरोप

Jitendra Awhad : आम्हाला 10 ते 15 कोटींचा निधी मिळायचा तेव्हा महापालिकेकडून जितेंद्र आव्हाडांना 200 ते 250 कोटींचा निधी मिळायचा, त्यामुळे निधीत भेद हा आरोप खोटा आहे.

Pankaj Rodekar

Thane Political News :

निधीबाबत विरोधकांची नेहमीच बोंबाबोंब असते. मात्र, सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही, असे सांगत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोधकांना सुनावले आहे. विरोधक म्हणून कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात ठाणे महापालिकेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने ते एक-दोनदा आमदार झाले असल्याचे धाडसी आणि खळबळजनक वक्तव्य सरनाईकांनी केले आहे.

ठाणे महापालिकेचे (Thane Municipal Corporation) तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल असो किंवा राजीव आयुक्त असताना आमच्यासारख्या आमदारांना महापालिकेकडून निधी मिळाला नाही. मात्र, आव्हाडांना (Jitendra Awhad) मोठा निधी मिळाला. आम्हाला 10 ते 15 कोटींचा निधी मिळायचा तेव्हा आव्हाडांना 200 ते 250 कोटींचा निधी मिळवायचा, असा दावा करत प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी विरोधकांचे निधी मिळत नसल्याचा आरोप खोडसर असल्याचे सांगितले.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिकेत येत आयुक्त अभिजित बांगर (Abhijeet Bangar) यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरनाईकांनी वरील वक्तव्य केले. आयुक्त बांगर हे कार्यक्षम अधिकारी आहेत. ते आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर 60 ते 70 टक्के खर्च फिटले गेले आहे. उर्वरित कर्ज पुढील वर्षभरात फिटले जाईल. दरम्यान, आगामी लोकसभा (Loksabha Election), त्यानंतर येणाऱ्या विधानसभा आणि महापालिका या निवडणुकीनंतर महापालिकेची आर्थिक स्थिती एमएमआर क्षेत्रातील इतर महापालिकांपेक्षा निश्चितच अधिक सक्षम झालेली दिसेल, असेही सरनाईकांनी या वेळी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधक नेहमीच महापालिकेतून निधी मिळत नसल्याबाबत तक्रार करत असतात. परंतु, त्यांचे आरोप खोडसर असतात. त्यावर सरनाईकांनी विरोधक आमदार जितेंद्र आव्हाड यांना महापालिका प्रशासनाने दिलेल्या निधीबाबत ऊहापोह केला. मात्र, आमदार सरनाईक यांनी त्यांना मिळालेल्या निधीपेक्षा निश्चितच जास्त निधी महापालिकेने आव्हाडांना दिल्याचा दावा केला. त्या निधीच्या कामावरूनच आव्हाड पुन्हा आमदार झाले, असाही दावा सरनाईकांनी केला.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT