Mumbai News : गुवाहाटीतील विनयभंग प्रकरणातील 'ते' आमदार कोण? अतुल लोंढेंचा शिंदे, फडणवीसांना सवाल

Atul Londhe बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी, अशा गप्पा मारणारा भारतीय जनता पक्षही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर सत्तेत वाटेकरी आहे, असेही अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
Atul Londhe, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Atul Londhe, Devendra Fadanvis, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गुवाहाटीमधील पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत ॲड. असीम सरोदे यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असून, हा प्रकार करणारे आमदार कोण, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, ॲड. असीम सरोदे यांनी दोन गंभीर आरोप केले आहेत. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व दोन आमदारांना मारहाण करण्यात आली. हे दोन्ही आरोप मन सुन्न करणारे आहेत. मविआ सरकार पाडण्यासाठी खास व्यवस्थेत गुवाहाटीच्या एका पंचतारांकित हॉटेलात आमदारांना ठेवण्यात आले होते आणि यामागे एक ‘महाशक्ती’ आहे हे जगजाहीर होते.

हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान एका एअर होस्टेसचा लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आला. हा प्रकार सरकारने दीड वर्ष दडपून का ठेवला? महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती समजली पाहिजे, सरकारने याची चौकशी करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावेत. बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी, अशा गप्पा मारणारा भारतीय जनता पक्षही एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेबरोबर सत्तेत वाटेकरी आहे.

Atul Londhe, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Adv Asim Sarode : गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांनी तर्रर्र नशेत काय केलं? अॅड. असीम सरोदे यांचा गंभीर आरोप

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा जो प्रकार झाला, त्या पापात भारतीय जनता पक्षही तेवढाच वाटेकरी आहे म्हणून भाजपने गुवाहाटी हॉटेलमधील प्रकरणावर खुलासा करण्याची हिंमत दाखवावी, केवळ बेटी बचाओ, महिला सक्षमीकरणाच्या पोकळ गप्पा मारू नयेत, असेही अतुल लोंढे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडताना गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमधील घडलेल्या प्रकरणाचा ॲड. असीम सरोदे यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असून, हा प्रकार करणारे आमदार कोण? याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांनी केला पाहिजे, असेही लोंढे यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Atul Londhe, Devendra Fadanvis, Eknath Shinde
असीम सरोदेंचा भाजपला चिमटा ; बघा काय म्हणाले ? | Asim Sarode On BJP |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com