Mumbai News : महाविकास आघाडी, मनसेच्या वतीने १ नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या रणनीतीसाठी तयारी सुरु आहे. त्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला महाविकास आघाडीसह मनसेचे ज्येष्ठ नेते उपस्थितीत आहेत. या बैठकीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नेतेमंडळी उपस्थित आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी, मनसेच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा दांडी मारली आहे. तर सलग दुसऱ्या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे नेमके त्यांच्या मनात चालले काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
निवडणूक आयोगाच्या गैरकारभारा विरोधात व बोगस मतदार उघडकीस आणल्यानंतर आता मत चोरीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी, मनसेचे नेते एकवटले आहेत. निवडणूक आयोगाचा गैरकारभार चव्हाटयावर आणण्यासाठी 1 नोव्हेंबरला मुंबईत ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या रणनीतीसाठी तयारी सुरु आहे. त्यासाठी गुरुवारी दुपारी बैठक पार पडली. या बैठकीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा दांडी मारली आहे. तर सलग दुसऱ्या बैठकीला काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
या बैठकीला या बैठकीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नेतेमंडळी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थित 1नोव्हेंबरला मुंबईत ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नियोजन करण्यात येत आहे.
काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडी व मनसेच्या संयुक्त बैठकीला दुसऱ्यांदा दांडी मारली आहे. याबाबत त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून ते मुंबई बाहेर असल्याने बैठकीला गैरहजर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मत चोरीच्या विरोधात दोनच दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर आता गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मतचोरीच्या विरोधात सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.