Rahul Gandhi-Soniya Gandhi  Sarkarnama
मुंबई

INDIA Aghadi Meeting In Mumbai : राहुल गांधी, सोनिया गांधींचे मुंबईत या शिवसेना नेत्यांनी केले स्वागत...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि खासदार सोनिया गांधी हे नुकतेच मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या दोघांचे स्वागत केले. आघाडीची बैठक होणाऱ्या ग्रॅंड ‘हयात’ हॉटेलमध्ये ते पोचले आहेत. सध्या ते अनेक युवा नेत्यांशी चर्चा करत आहेत. (Rahul Gandhi, Sonia Gandhi arrived in Mumbai for India Aghadi meeting)

इंडिया आघाडीची मुंबईत आजपासून दोन दिवसीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते मुंबईत आले आहेत. त्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबईत विमानतळावर आगमन झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार संजय निरुपम यांच्यासह शिवसेनेचे अनिल परब, सचिन अहिर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी मराठमोळा साज होता.

ग्रॅंड हयात हॉटेलच्या बाहेर या दोघांना घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत स्वतः हजर होते. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे सावंत यांनी स्वागत केले. हॉटेलबाहेर ढोल-ताशाच्या गजरात आणि तुतारीच्या सुरात गांधी यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. राहुल गांधी यांनी सावंत यांच्या हस्तांदोलन करत अलिंगन दिले. त्यानंतर हे सर्व नेते ‘हॉटेल हयात’मध्ये गेले.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत लोगोचे अनावारण होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, इंडिया आघाडीच्या संयोजकाच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या नावावर एकमत झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय अकरा प्रवक्त्यांची टीम यावेळी घोषित केली जाणार आहे. इंडिया आघाडीची अधिकृत भूमिका ते मांडतील.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, आपचे खासदार राघव चढ्ढा, फारुख अब्दुल्ला, डी. राजा यांच्यासह देशभरात महत्वाचे नेते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT