Rahul Narwekar Sarkarnama
मुंबई

Rahul Narwekar's Delhi Tour : दिल्लीला तातडीने जाण्याचे कारण राहुल नार्वेकरांनीच सांगितले…

MLA Disqualification Case : आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ता. १८ सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दिरंगाईबद्दल कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

Vijaykumar Dudhale

Mumbai Political News: दिल्लीचा हा माझा पूर्वनियोजित दौरा आहे. अनेक कार्यक्रम आणि बैठका आहेत, त्यात मला सहभागी व्हायचे आहे, त्यामुळे मी दिल्लीला चाललो आहे, असे स्पष्टीकरण विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले. (Rahul Narwekar said the reason for going to Delhi immediately...)

आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता. १८ सप्टेंबर) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दिरंगाईबद्दल कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आम्ही तीन महिन्यांची मुदत घातली नव्हती. पण, विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखायला हवा. गेल्या चार महिन्यांत अध्यक्षांनी केवळ एक सुनावणी घेतली. त्यानंतर पुढची तारीखही अध्यक्षांनी दिली नाही, अशी नाराजी व्यक्त केली हाेती.

सरन्यायाधीशांच्या नाराजीनंतर ॲड. राहुल नार्वेकर हे आज (ता. २१ सप्टेंबर) दिल्लीच्या दौऱ्यावर निघाले होते. त्याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात असतानाच खुद्द ॲड. नार्वेकर यांनीच पुढे येऊन आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत भाष्य केले आहे. त्यात त्यांनी आपण दिल्लीला का जात आहोत, हे स्पष्टपणे नमूद केले आहे.

महिला आरक्षणावर ते म्हणाले की, अत्यंत सकारात्मक पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. महिलांचे बळ आणि ताकद वाढविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. महिलांना सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या संधी देण्यासाठी महत्त्वाचे विधेयक केंद्र सरकारने आणले आहे. त्याबद्दल केंद्र सरकारला मी धन्यवाद देतो. विरोधक काय चर्चा करत आहेत, यापेक्षा आज जे होत आहे, ते देशातील महिलांच्या हिताचे आहे.

डेक्कन ओडिसी सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र पर्यटन बोर्ड आणि रेल्वेला शुभेच्छा देतो. या डेक्कन ओडिसीमुळे थेट पर्यटकाला फायदा होत आहे, असेही विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले होते?

शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्याच्या आत सुनावणीची पुढची तारीख द्यावी. तसेच, या प्रकरणाचा निकाल कधीपर्यंत देणार ॉयाचे वेळापत्रक आम्हाला दोन आठवड्यांनी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT