Mumbai News : आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठे पाऊल उचलले आहे. नार्वेकर हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक ते दोन दिवसांत नोटीस पाठविणार आहेत. या दोन्ही पक्षप्रमुखांची बाजू अध्यक्ष नार्वेकर हे ऐकून घेणार आहेत. (Assembly Speaker will send notice to Thackeray-Shinde in two days)
आमदार अपात्रते प्रकरणातील दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सोमवारी (ता. १८) विधानसभा अध्यक्षांच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एक आठवड्यात पुढच्या सुनावणीची तारीख द्यावी. तुम्ही या प्रकरणाचा निकाल कधीपर्यंत देणार आहात, त्यांचे टाइम टेबल द्यावे, असा आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिला होता.
सर्वोच्च न्यायालने कडक शब्दांत फटकारल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या प्रमुखांना येत्या एक ते दोन दिवसांत नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षप्रमुखांना आमदार अपात्रतेबाबत आपापली बाजू मांडावी लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी कायदेतज्ज्ञ आणि विधिमंडळाच्या सचिवांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
दोन्ही गटांच्या प्रमुखांना आपली बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आल्याची ही नोटीस असणार आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचे प्रमुख आपापल्या आमदारांच्या बाबत आपली भूमिका विधानसभा अध्यक्षांपढे मांडणार आहेत, याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभा अध्यक्षांपुढे आपली बाजू मांडण्यासाठी स्वतः उपस्थित राहणार की, वकिलांच्या माध्यमातून आपल्या पक्षाची बाजू मांडणार, हे पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.