Ajit Pawar-Padalkar News: धनगर आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; अजित पवार-पडळकर येणार एकत्र

Dhangar Reservation : या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर हेही उपस्थित राहणार आहेत.
Gopichand Padalkar-Eknath Shinde-Ajit Pawar
Gopichand Padalkar-Eknath Shinde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आरक्षणानंतर राज्यात धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता. २१ सप्टेंबर) सह्याद्री अतिथिगृहावर धनगर आरक्षणप्रश्नी दुपारी दोन वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर हेही उपस्थित राहणार आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी पडळकरांनी अजित पवारांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. बैठकीसाठी दोघे एकत्र येणार आहेत. (Meeting called by CM on Dhangar reservation issue; Ajit Pawar-Padalkar will come together)

सह्याद्री अतिथिगृहावर होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी चौंडी येथील एक शिष्टमंडळही मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला शिंदे, पवार, फडणवीस यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत. आमदार महादेव जानकर यांना मात्र या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही, त्यामुळे जानकर समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Gopichand Padalkar-Eknath Shinde-Ajit Pawar
MLA Disqualification Case Update : आमदार अपात्रता प्रकरणात मोठी घडामोड; विधानसभा अध्यक्ष दोन दिवसांत ठाकरे-शिंदे यांना नोटीस पाठविणार

धनगर आरक्षणासाठी चौंडी (जि. नगर) येथे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच, राज्यात ठिकठिकाणी उपोषण आणि निवेदनाच्या माध्यमातून धनगर समाजाने लढा उभारला आहे. तसेच, चार दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धनगर आरक्षणाचे निवेदन दिले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले नव्हते. त्याला कारणही त्यांनी सांगितले होते.

अजित पवार जरी भाजपसोबत आले असले ती आम्ही त्यांना मानत नाही. त्यांना निवेदन देण्याची गरज मला वाटली नाही. अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू आहे, अशी टीका पडळकर यांनी पवारांवर केली होती. त्यावरून राज्यात रान पेटले आहे. राष्ट्रवादीकडून पडळकरांचा निषेध केला जात आहे.

Gopichand Padalkar-Eknath Shinde-Ajit Pawar
BJP Lok Sabha Strategy : मंत्रिपदाची अपेक्षा करू नका, लोकसभेच्या तयारीला लागा; सर्व आमदारांना भाजप हाय कमांडचे आदेश ?

दरम्यान, खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही पडळकरांचे कान टोचले होते. त्यांची भाषा योग्य नाही. महायुतीमधील तीन पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या नेत्यांविरोधात बोलताना भान ठेवले पाहिजे, असे सुनावले होते. तसेच, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांनी संयम बाळगावा, असा सल्ला दिला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार आणि गोपीचंद पडळकर हे आज एकाच बैठकीला एकत्र येत आहे. त्यांच्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

Gopichand Padalkar-Eknath Shinde-Ajit Pawar
Shirdi Crime News : तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली; जावयाने सासुरवाडीत धारधार शस्त्राने केला हल्ला !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com