Rahul Narwekar Sarkarnama
मुंबई

Rahul Narwekar : 'मी यांच्यासामोर खूप छोटा माणूस'; राहुल नार्वेकरांचा रोख कुणाकडे ?

Sunil Balasaheb Dhumal

NCP MLA Disqualification Result News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी पक्षा संदर्भातील निकाल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बाजूने दिला. अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि मूळ पक्ष हा त्यांचा आहे, असा निर्णय त्यांनी दिला. त्यांच्या या निर्णयावरून अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र या सगळ्यांना उत्तर देताना मी खूप छोटा आहे या लोकांसमोर, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

'तोच' घोळ येथेही घातला

युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या बाबतीतही त्यांनी हाच निर्णय दिला. आमच्या बदल जो घोळ झाला, तोच या ठिकाणी पण केला गेला. अध्यक्ष पक्षपात करत असल्याचा ठपकाही आदित्य यांनी ठेवला. आता पक्ष लुटायचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. पक्ष फोडून तुमचे 400 पार होणार नाहीत. अध्यक्ष यांनी संविधानाचा अवमान केला आहे. इतिहासात त्यांचे नाव कुठल्या बाजुला दिले जाईल? असा प्रश्न उपस्थित करत शरद पवार खंबीरपणे लढत असल्याचेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

निकाल चुलीत घाला..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही त्यांच्या शैलीत राहुल नार्वेकरांचा समाचार घेतला आहे. राहुल नार्वेकर यांनी जो निकाल तो चुकीचा असून, असा निकाल काय करायचा आहे. असले निकाल चुलीत घाला, असे वादग्रस्त विधान राऊतांनी केले आहे. विधानसभा राहुल नार्वेकर यांना हा निकाल वरून लिहून आलेला आहे. हायकमांडने जो निकाल दिला, तो केवळ यांनी वाचून दाखवल्याचेही ते बोलले. जो अन्याय शिवसेनेसोबत झाला, तसाच अन्याय राष्ट्रवादीसोबत झाला असल्याचे राऊत म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सगळ्या आरोप प्रत्यरोपांवर उत्तर देताना राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी मी छोटा असल्याचा मिश्किल टोला लगावला आहे. आम्ही कलमर्यादाचा निर्णय दिला आहे. ज्या मर्यादा अटी घालून दिल्या होत्या, त्या आधीन राहून निर्णय दिला आहे. जितेंद्र आव्हाड, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे घटनातज्ज्ञ आहेत. त्यांच्या पुढे मी खूप माणूस आहे, असा टोलाही नार्वेकरांनी लगावला आहे.

निकाल वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, 30 जून 2023 रोजी पक्षात फूट पडली. या दोन्ही गटांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली. या दोन्ही गटांनी आपणच खरा पक्ष असल्याची बाजू मांडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सर्व समित्यांची बाजूही लक्षात घेतली. निर्णय घेताना कार्यकारिणी आणि अध्यक्षांचे अधिकार विचारात घेतले. महत्त्वाचे राजकीय निर्णय अध्यक्ष घेतील असे पक्षघटनेत लिहिले आहे. अध्यक्षपदाची निवड घटनेला धरून नाही असा दावा दोन्ही गटांनी केला होता.

अजित पवार (Ajit Pawar) यांची 30 जून रोजी 2023 रोजी पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि ते 2 जुलै रोजी राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. राहुल नार्वेकर निकालात पुढे म्हणाले, शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी देणे, किंवा त्यांच्या निर्णयाला विरोध करणे हे कृत्य पक्षाविरोधात आहे, असे म्हणता येत नाही. हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT