Raj Thackeray sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरे टोल नाक्यावर उतरले, अधिकाऱ्याला झापत...

Khalapur Toll Plaza : टोल नाक्यावर पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे सांगण्यात येत होते

Roshan More

Khalapur : टोल प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना स्वतःला टोला नाक्यावर उतरण्याची वेळ आली. पिंपरी-चिंचवडहून मुंबईला परत निघालेले राज ठाकरे खालापूर टोल नाक्यावर स्वतः उतरले. पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या असताना अँब्युलन्सला रस्ता मोकळा करून देत टोल अधिकाऱ्यांना ठाकरे शैलीत झापले.

ट्रॅफिक जॅममुळे राज ठाकरे टोल नाक्यावर उतरले टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम असल्याचे त्यांनी पाहिले. पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा असल्याची माहिती राज यांना मिळाली. त्यांनी टोलवरील अधिकाऱ्यांना दम भरत वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यास सांगितले. परत बांबुला लावला तर तुम्हाला...., असे म्हणत राज ठाकरे यांनी टोल अधिकाऱ्याला फटकारले

जर वाहनांची रांग पिवळ्या पटी बाहेर जात असेल तर वाहनांना लगेच सोडण्याची तरतूद आहे.मात्र, टोल नाक्यावर वाहनांची भली मोठी रांग लागली असताना देखील टोलवसूली सुरुच होती. टोल अधिकाऱ्यांना धारेवर धर राज यांनी नियमाप्रमाणे टोल वसुली का होत नाही, याची विचारणा केली.

टोल प्रश्नी मनसे आक्रमक झाली होती. तेव्हा मंत्री दादा भुसे यांनी राज यांची भेट घेत टोल नाक्या संदर्भातील सर्व नियमांचे पालन केले जात असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, राज ठाकरे यांनी स्वतः टोल नाक्यावर नियमांचे पालन होत नसल्याचे पाहिल्याने मनसे पुन्हा या प्रश्नी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT