Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मराठी तरुणांसाठी कायमच तळमळ पहायला मिळत असते. आता त्यांनी जास्तीत जास्त मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाव्या, यासाठी तत्परता दाखविली आहे. मराठी तरुणांनी रेल्वे विभागातील नोकरीसाठी अर्ज करावेत, यासाठी राज ठाकरे यांनी स्वतः ट्विट केले आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्र सैनिकांना देखील त्यांनी आवाहन केले आहे. (Raj Thackeray News)
केवळ वेबसाईट बघून चालणार नाही...
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयामार्फत काल एक जाहिरात देण्यात आली. सहाय्यक लोको पायलटसाठी जागा रिक्त असल्याची ही जाहिरात आहे. या जागेसाठी जास्तीत जास्त मराठी तरुणांनी अर्ज करावा, असे आवाहन स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग तरुण - तरुणींच्या मदतीसाठी कायम तत्पर असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे.
त्यांचबरोबर त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना देखील आवाहन केले आहे. केवळ वेबसाईट बघून चालणार नाही तर शाखा - शाखांमध्ये, संपर्क कार्यालयात, गाड्यांवर या बदलची माहिती लावावी. या विषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत - जास्त मराठी तरूणांना यात नोकरी कशी मिळवेल याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे, असे राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही...
विश्व मराठी संमेलनात राज ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. मराठी ही आपली राष्ट्रभाषा नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मी कडवट मराठी आहे. माझ्यावर संस्कारच तसे केले गेले आहेत. आपण आधी महाराष्ट्रात लक्ष देणं गरजेचं आहे. जगभरात जरी मराठी माणूस गेला असेल, तरी देखील महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ऐकू येते तेव्हा त्रास होतो, असेही राज ठाकरेंनी सांगितले.
यावेळी त्यांनी हे देखील नमूद केलं आहे की, हिंदी भाषेला माझा विरोध नाही, पण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. देशात जशा इतर भाषा आहेत तशीच हिंदी देखील आहे. आता नोकऱ्यांवरून पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मराठी तरुण - तरुणींना जास्तीत - जास्त लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे.
मराठी सर्वांत उत्तम आणि समृद्ध भाषा...
मराठी भाषा सर्वात उत्तम आहे. समृद्ध भाषा आहे. तुम्हाला जी भाषा शिकायची ती शिका, पण जिथे राहताय ती भाषा प्रथम शिका. त्यात कसला कमीपणा आला. मराठीबद्दल बोलले की तुम्ही म्हणणार हे संकुचित आहेत. या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या भाषेबद्दल आणि राज्याबद्दल प्रेम वाटते. जगातील सर्वांत मोठा पुतळा त्यांना गुजरातमध्ये बांधावासा वाटतो. गिफ्ट सिटी पंतप्रधानांना गुजरातमध्ये बांधावी वाटते.
हिऱ्यांचा व्यापार त्यांना गुजरातमध्ये न्यावासा वाटतो. जर पंतप्रधानांना स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल, तर तुम्ही आम्ही का लपवतो, अशी विचारणा करत काही जण म्हणतील पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत आहे. परंतु ही टीका नाही. त्यांच्यासारखे प्रेम आपण आपल्या राज्याबद्दल दाखवले पाहिजे. आपण आधी महाराष्ट्राकडे लक्ष दिले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.