Railway Job : रेल्वेत लोको पायलटची बंपर भरती; 5,696 जागा भरणार

Career News : अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 फेब्रुवारी 2024
Job Opportunity in Railways
Job Opportunity in RailwaysSarkarnama
Published on
Updated on

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सुशिक्षित उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. रेल्वेने सहायक लोको पायलट या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत रेल्वेकडून तब्बल 5,696 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीचा सविस्तर तपशील जाणून घेऊयात...

भारतीय रेल्वेमध्ये कर्मचारी होण्याची अनेकांची इच्छा असते. अशा इच्छुक आणि पात्र उमेदवारांना रेल्वेमध्ये सहायक लोको पायलट म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेने देशभरातील विविध विभागांसाठी असिस्टंट लोको पायलट (ALP) पदाची भरती जाहीर केली आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 फेब्रुवारी 2024 आहे.

Job Opportunity in Railways
Shiv Sena News : शिवसेना शिंदेंची... पण शिवसैनिक कुणाचे?

रेल्वेकडून सहायक लोको पालयटपदाच्या एकूण 5,696 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण यासह आयटीआय उतीर्ण असणे आवश्यक आहे. आयटीआयमध्ये उमेदवाराने आर्मेचर & कॉइल वाइंडर , इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, हीट इंजिन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक यांसह तत्सम कोर्स पूर्ण केलेले असावेत किंवा उमेदवार हा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा पदवी पूर्ण केलेला असावा.

या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांचे वय 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षांच्यादरम्यान असावे. सरकारी नियमानुसार उमेदवार जर SC/ST प्रवर्गातील असल्यास त्याला जास्तीत जास्त वयोमर्यादेत 05 वर्षे सूट, तर OBC प्रवर्गातील उमेदवारासाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून आकारण्यात येणारे शुल्क हे मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 आणि जनरल प्रवर्गासाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. उमेदवाराने ते अर्ज करताना ऑनलाईन भरणा करायचा आहे.

अर्ज प्रक्रिया

या सहायक लोको पायलटपदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज इंडियन रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर (https://www.recruitmentrrb.in/) सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज सादर करताना उमेदवाराने आपली शैक्षणिक पात्रता आणि संबंधित माहिती अचूक भरावी. अर्जप्राप्तीनंतर उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणीदेखील केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात सविस्तर आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी पुढील लिंकवरील भरतीची जाहिरात पाहून घ्यावी. https://drive.google.com/file/d/19vXawxTKXSWJ43TRWq7CVugSl77s4IMB/view

Edited by: Mangesh Mahale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com