Rajan Vichare News Sarkarnama
मुंबई

Thane Politics : खासदार विचारेंचा शिंदे गटाला खणखणीत इशारा; आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत...

Rajan Vichare Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात तणाव निर्माण झाला आहे.

Amol Jaybhaye

Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात तणाव निर्माण झाला आहे. मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा पाडल्यामुळे ठाण्यातील राजकारण तापले आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैणात केला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.

पोलिसांच्या (Police) बंदोबस्तात शाखा पाडण्यात आल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला आहे. दादागिरी अशी जर चालत असेल तर आम्हीदेखील बांगड्या भरलेल्या नाहीत. शाखेचा टॅक्स आमचे पदाधिकारी भरत आहेत. पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. या शिंदेंच्या सरकारला थोडे दिवस उरले आहेत. यांचा कार्यक्रम दोन महिन्यांचा असल्याचा हल्लाबोल विचारे यांनी केला.

दरम्यान, उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) ताफा ठाण्यातील मुंब्रा येथील शाखेची पाहणी करण्यासाठी रवाना झाला आहे. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाडदेखील आहेत. तसेच शाखेजवळ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही कार्यकर्ते जमा झाले आहेत.

त्यामुळे मुंब्रा पोलिस स्टेशन तसेच शिवसेना (Shivsena) शाखा या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कारण येथे दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. पोलिस उपायुक्त गणेश गावदे स्वत: येथे हजर आहेत. मुंब्रा पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर उद्धव ठाकरे यांचे भाषण होणार आहे. ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

यासाठी स्टेजही उभारण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी पोलिसांवर आरोप करीत त्यांना आव्हान दिले होते. पोलिस आयुक्तांना आव्हान करतो, आम्ही येत आहोत, तुम्ही आम्हाला अडवून दाखवा, असा इशाराही राऊत यांनी दिला होता. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उद्धव ठाकरेंचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तणावाचे आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT