Ajit pawar Sarkarnama
मुंबई

Rajya Sabha Election 2024 : राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? 'या' नावांची जोरदार चर्चा

Ncp Meeting Over Rajya Sabha Election Candidate : राज्यसभेचा उमेदवारीबाबतची उत्सुकता वाढली...

सरकारनामा ब्यूरो

Rajya Sabha Election Maharashtra News :

राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातले राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ( Ajit Pawar गट ) उमेदवारही आजच ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार आहे. यासाठी मुंबईत देवगिरी निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उमेदवाराबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर आज आमदारांसोबत चर्चा करून उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची मोठी संख्या आहे. यामुळे राज्यसभेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राज्यसभा उमेदवारीसाठी यांची नावं चर्चेत

ईद्रिस नाईकवडी, बाबा सिद्दिकी, नवाब मलिक, पार्थ पवार, छगन भुजबळ, आनंद परांजपे, सुनील तटकरे

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. राज्यसभेतील एकूण 17 राज्यांतील 56 सदस्यांचा कार्यकाळ हा एप्रिलमध्ये संपणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस उरल्याने राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT