Soniya Gandhi : सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? 'या' राज्यातून राज्यसभेवर जाण्याची शक्यता

Congress Rajyasabha Election : काँग्रेस दोन दिवसांत राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार घोषित करू शकते.
Soniya Gandhi
Soniya Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक पार पडणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 56 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपत आहेत. त्यापार्श्वभूमीवर भाजपनं महाराष्ट्र वगळता बाकीकडे उमेदवार जाहीर केले आहेत. तर, काँग्रेसनं ( Congress ) अद्याप उमेदवार घोषित केले नाहीत. अशातच काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या, सोनिया गांधी राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ( Soniya Gandhi Candidate Rajyasbha )

Soniya Gandhi
Ashok Chavan Resigns : विश्वासघातकी..! चव्हाणांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या बड्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया...

सोनिया गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघातून 2019 मध्ये लोकसभेत निवडून गेल्या होत्या. पण, आता सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेच्या उमेदवार असू शकतात. यासह अभिषेक मनु सिंघवी कर्नाटकमधून, अखिलेश प्रसाद सिंह यांना बिहारमधून राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते. तर, काँग्रेस सय्यद नासिर हुसैन आणि अजय माकन यांना काँग्रेस पुन्हा राज्यसभेवर संधी धेऊ शकते. पुढील दोन दिवसांत काँग्रेस उमेदवारांची नावं यादी जाहीरू करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं होतं. त्या-त्या राज्यातूनच उमेदवारांना राज्यसभेवर संधी द्यावी, अशी मागणी नेत्यांकडून करण्यात येत होती. पण, मागील राज्यसभा निवडणुकीत दुसऱ्या राज्यातील उमेदावारांनाही संधी देण्यात आली होती. जसं की, उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढी महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते.

काँग्रेसला किती जागा मिळू शकतात?

मध्य प्रदेशातून काँग्रेसला एक जागा मिळू शकते. त्यासाठी अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचाही समावेश आहे. तर, कर्नाटकमध्ये ३, तेलंगणात २, महाराष्ट्र, बिहार, हिमाचलप्रदेश आणि झारखंडमध्ये राज्यसभेची प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे. पण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून एक जागा निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

Soniya Gandhi
Rahul Gandhi Vs PM Modi : 'दिन रात ‘झूठ की खेती’ करने वाले..' म्हणत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com