Ratan Tata .jpg Sarkarnama
मुंबई

Ratan Tata Hospitalised : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटांची प्रकृती चिंताजनक; 'आयसीयू'त उपचार सुरू, देशभरातून प्रार्थना

Ratan Tata in critical condition at Mumbai Hospital : काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रकृतीविषयीची माहिती दिली होती.त्यात त्यांनी'वयोमान लक्षात घेता माझ्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत,काळजी करण्यासारखं काहीही नाही,असं टाटा यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

Deepak Kulkarni

Mumbai News : देशातील प्रसिद्ध टाटा समूहाचे प्रमुख आणि उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे.त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.मात्र,त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी रतन टाटा (Ratan Tata) यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रकृतीविषयीची माहिती दिली होती.त्यात त्यांनी'वयोमान लक्षात घेता माझ्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत,काळजी करण्यासारखं काहीही नाही,असं टाटा यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहे. त्यांच्या अनेक शारीरिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.डॉ. शाहरुख हे एक नामांकित डॉक्टर म्हणून ओळखले जातात.

देशाच्या कानाकोपऱ्यातून रतन टाटांच्या प्रकृती स्वास्थासाठी व ते लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केल्या जात आहे. सोशल मीडियातून त्यांच्यासाठी 'गेट वेल सून'यांसारख्या मेसेजद्वारे पोस्ट केले जात आहे. टाटा कंपनीच्या माध्यमातून लाखो कुटुंबांचं त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडलं आहे. अनोखी देशभक्ती व देशहिताचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

टाटा कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी भारतासह विविध देशांमध्ये मोठे औद्योगिक प्रकल्प उभे केले आहे.उद्योगविश्वात यशाची एकापाठोपाठ एक शिखरे सर करतानाच त्यांनी समाजाशी असलेली बांधिलकीही जपली.

देशात ज्या ज्यावेळी मोठ्या आपत्ती आल्या त्या काळात त्यांनी टाटा समूहाच्यावतीने तत्परतेने मदतीसाठी पुढाकार घेतला. कोरोनाकाळातही रतन टाटा यांनी मोठी आर्थिक मदत केली होती.त्यामुळेच त्यांची जनमानसांतली प्रतिमा आणखी अधोरेखित झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT