Imran Khan News : आधीच कर्जबाजारी त्यात पाकिस्तानला लागला कोट्यवधींचा चुना ; इम्रान खान कारणीभूत!

Big financial loss to Pakistan : जाणून घ्या, तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्यामुळे नेमकं असं काय घडलं आहे?
Imran Khan News : आधीच कर्जबाजारी त्यात  पाकिस्तानला लागला कोट्यवधींचा चुना ; इम्रान खान कारणीभूत!
Published on
Updated on

Pakistan Political News : तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाकडून आठवड्याच्या अखेरीस केल्या गेलेल्या आंदोनलामुळे राजाधानी इस्लामाबादेत जवळपास तब्बल २४ कोटींचे नुकसान झाले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार यामध्ये नुकसान झालेल्या सार्वजनिक मालमत्ता आणि खासगी संपत्तींचा समावेश आहे.

इस्लामाबाद इन्स्पेक्टर जनरल कार्यालयाद्वारे मुख्य आयुक्तांना सोपवल्या गेलेल्या रिपोर्टमध्ये इम्रान खान(Imran Khan) यांचा पक्ष पाकिस्ताना तहरीक-ए-इन्साफच्या कार्यकर्ता आणि समर्थकांद्वारे आठवड्याच्या अखेरीस केल्या गेलेल्या हिंसक आंदोलनाशी निगडीत माहिती दिली गेली आहे.

Imran Khan News : आधीच कर्जबाजारी त्यात  पाकिस्तानला लागला कोट्यवधींचा चुना ; इम्रान खान कारणीभूत!
Pakistan News : पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटला ; 'POK'मधील अत्याचाराचा 'UNHRC'मध्ये झाला 'पर्दाफाश'

पाकिस्तान(Pakistan) सरकारद्वारे घटना दुरूस्ती लागू केल्यानंतर इम्रान खान यांनी न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याची मागणी करत, प्रदर्शन रॅलीचे आवाहन केले आणि यासाठी डी-चौक या ठिकाणाची निवड केली गेली. याचदरम्यान इम्रान खान यांच्या सुटकेचीही मागणी केली गेली.

Imran Khan News : आधीच कर्जबाजारी त्यात  पाकिस्तानला लागला कोट्यवधींचा चुना ; इम्रान खान कारणीभूत!
Omar Bin Laden : नेमका कोण आहे, 'ओसामा'चा मुलगा उमर बिन लादेन? ; एक चूक अन् फ्रान्सने उचललं 'हे' मोठं पाऊल!

जियो न्यूजने पोलिस रिपोर्टच्या हवाल्याने म्हटले की, आंदोलना दरम्यान १४ कोटी रुपयांचे ४४१ सेफ सिटी कॅमरेही नष्ट केले गेले. याशिवाय दहा पोलिस वाहनं, ३१ मोटारसायकल आणि ५१ गॅस मास्कचे देखील नुकसान केले आहे.

रिपोर्टमध्ये पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांच्याकडून मंगळवारी केलं गेलेलं विधानही आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की त्यांच्या मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार शाखेने आंदोलनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची पडताळणी केली, जे आर्थिक घडामोडी थांबल्यामुळे १९ अब्ज पर्यंत पोहचले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com