Amol Kirtikar Vs Ravindra Waikar
Amol Kirtikar Vs Ravindra Waikar Sarkarnama
मुंबई

Ravindra Waikar Vs Amol Kirtikar: 'वायकरांचा विजय 'मॅनेज'...'; कुणी केला गंभीर आरोप,न्यायालयाचा दरवाजाही ठोठावणार

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का देत 48 पैकी 31 जागा जिंकल्या.त्यात आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने उल्लेखनीय कामगिरी करताना महायुतीच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली.त्यात मुंबईतही ठाकरेंचाच करिष्मा कायम असल्याचं पाहायला मिळालं.पण याचवेळी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचा निसटता विजय झाला होता. त्यात अवघ्या 48 मतांनी विजय खेचून आणला.

हा पराभव ठाकरे गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.या पराभवाची सल कायम असतानाच आता रवींद्र वायकरांचा (Ravindra Waikar) विजय अडचणीत आणण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघातील वायकरांचा विजय मॅनेज केला असल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीतील दोन अपक्ष उमेदवारांनी रवींद्र वायकरांच्या विरोधात वनराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हिंदू समाज पक्षाचे भरत शाह आणि जनआधार पार्टीचे सुरिंदर अरोरा मोहन अशी तक्रार दाखल केलेल्यांची नावे आहेत.यामुळे वायकरांच्या डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटात नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

भरत शाह आणि जनआधार पार्टीचे सुरिंदर अरोरा मोहन यांनी ही शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.तसेच याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला भरत शहा यांनी दिला आहे.

ईडी चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी रवींद्र वायकरांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली.त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.त्यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली.जोगेश्वरीतील राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी गेल्या काही महिन्यापासून ईडीचा ससेमिरा वायकरांच्या मागे होता.या प्रकरणी ईडीने वायकरांना अनेकदा चौकशीसाठी बोलाविले होते.

या चौकशीला कंटाळून वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात होते. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर(Amol Kirtikar) मैदानात होते. शिंदे आणि ठाकरेंच्या या दोन लढाईची चर्चा मुंबईतच नाहीतर महाराष्ट्रभर होती. पण अखेर मतमोजणीत अवघ्या 48 मतांच्या फरकांनी वायकरांनी लोकसभा निवडणूक जिंकली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT