Rohit Pawar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Assembly Special Session: मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 'ते' शब्द अन् रोहित पवारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली

Umesh Bambare-Patil

Assembly special session 2024 LIVE Updates : मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी सर्वपक्षीय आमदारांचे व सरकारचे आभार मानले आहेत. पण, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ‘आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करूया’ हे शब्द मात्र त्यांना भीतिदायक वाटत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत विधेयक आणण्याचा सरकारचा प्रयत्न सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा ठरू नये, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.

मराठा आरक्षणाबाबत आज झालेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत दहा टक्के देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. तसेच आम्ही इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीतले आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर बहुतांशी राजकीय पक्षातील नेत्यांनी सरकारचे आभार मानले.

मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देताना हे आरक्षण टिकण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका मांडली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया देताना सरकारला डिवचलं आहे. त्यांनी म्हटले की, निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत विधेयक आणण्याचा सरकारचा प्रयत्न सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा ठरू नये.

त्यांनी म्हटले की, मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल सवर्पक्षीय आमदारांचे व सरकारचे आभार. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले ‘आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करूया’ हे शब्द मात्र यापूर्वीचा राजकीय अनुभव बघता भीतिदायक वाटतात. विधेयकाचा मसुदा वरकरणी पाहता त्यात अनेक त्रुटी दिसत असून, २८ टक्के लोकसंख्या दाखवताना आरक्षण मात्र १० टक्के देण्याचा निर्णय कुठल्या आधारावर झाला, हे स्पष्ट होत नाही.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगासंदर्भात नोंदवलेली निरीक्षणेही दुरुस्त केलेली दिसत नाहीत. एकंदरीतच निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत विधेयक आणण्याचा सरकारचा प्रयत्न सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा ठरू नये. आता हे विधेयक टिकवण्यासाठी सरकारसह सवर्पक्षीय नेते प्रामाणिक प्रयत्न करतील, असा विश्वास आणि अपेक्षा असल्याचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT