Rohit Pawar On Ajit Pawar : अजितदादा भावनिक होतील असं वाटलं नव्हतं; पवार विरुद्ध पवार संघर्ष दुर्दैवी; रोहित पवारांची टीका!

Rohit Pawar On Ajit Pawar : भाजपला जे कधीच जमलं नाही ते अजितदादांनी...
Rohit Pawar On Ajit Pawar
Rohit Pawar On Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी निवडणुकीत मला आणि माझ्या परिवाराला सर्वजण मिळून एकटं पाडतील. माझ्या विरोधात सर्वजण प्रचार करतील. आपण आपल्यापरीने काहींना विनंती करू. तेवढं करूनही सगळे मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतील; पण बारामतीची जनता माझ्यासोबत असणार याची मला खात्री आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली. यावर आता पवार कुटुंबामधून प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Rohit Pawar On Ajit Pawar
NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला हवा अल्पसंख्याकांचा 'विश्वास'; युवा मेळाव्यानंतर नजर अल्पसंख्याकांवर

रोहित पवार म्हणाले, "अजित पवारांकडूनच लोकांना भावनिक आवाहन केले जाईल, असं वाटलं नव्हतं. अजितदादांनी जो काही निर्णय घेतला तो नागरिकांना आवडलेला नाही. आमच्या कुटुंबालादेखील तो काही रुचलेला नाही. अजितदादा म्हणतात की, मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर काहीतरी वेगळं लाभलं असतं. त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं. मंत्री केलं गेलं. आणखी काय पाहिजे? पदच हवं होतं तर भाजपसोबत तुमचा संसार मांडण्याचं कारण पदच आहे का? असे अनेक मुद्दे आता उपस्थित झाले आहेत."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar On Ajit Pawar
Pune Loksabha : धंगेकर फॅक्टर निष्प्रभ करण्यासाठी भाजप लोकसभेला वापरणार मुळीक अस्त्र?

अजितदादांच्या मदतीने भाजपने साधलं -

"राष्ट्रवादीच्या बाबतीत जे भाजपला कधीच जमलं नाही ते अजितदादांच्या माध्यमातून भाजपने साध्य करून घेतलं. पवार कुटुंबात फूट पाडण्याचं काम भाजपने केलं. पवार विरुद्ध पवार असा संघर्ष जो भाजप उभा करू पाहत आहे, तो दुर्दैवी आहे. सर्वात दुर्दैवी म्हणजे तो अजित पवारांच्या माध्यमातून केला जात आहे," असेही रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले, "आमच्याकडून भावनिक आवाहन करण्यात येणार नाही. त्याचं कारण बारामती मतदारसंघातील लोक वर्षानुवर्षे आम्हाला ओळखतात. त्यामुळे भावनिक आवाहन करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही, पण विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या भाषणाची पद्धत काहीतरी वेगळं सुचवते. त्याची नोंद बारामतीतील सामंजस्य मतदार घेतील, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांचा समाचार घेतला.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com