Rohit Pawar 
मुंबई

Rohit Pawar : रोहित पवारांच्या हातून आणखी एका मंत्र्याची होणार शिकार? 5,000 कोटींचा घोटाळा, निवडणुकीत पैसा वापरल्याचा खळबळजनक आरोप

Rohit Pawar : शासनाची 5000 कोटी रुपयांची जमीन महायुती सरकारमधील एका मंत्र्यानं लाटल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

Amit Ujagare

Rohit Pawar serious allegations against Sanjay Shirsat : राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट करुन त्यांची विकेट घेणाऱ्या रोहित पवारांनी आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा घोटाळा केल्याचा दावा केला आहे. याप्रकरणात त्यांना राजीनामा द्यावाच लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाची तब्बल ५००० कोटी रुपयांची जमीन शिरसाटांनी लाटल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

याप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज सिडको भवनावर मोर्चा काढण्यात आला. या घोटाळ्यात अनेक नेत्यांचा हात असून सर्वांना यातील शेकडो कोटींचा वाटा मिळाला असून हाच पैसा विधानसभा निवडणुकीत वापरला गेला असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

शिरसाटांना राजीनामा द्यावा लागेल - पवार

रोहित पवार म्हणाले, "संजय शिरसाट यांना राजीनामा द्यावाचं लागेल, शंभर टक्के यामध्ये काळंबेरं झालेलं आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्याकडून यावर कोणीही उत्तर देणार नाही कारण त्यांच्यात हिंमतच नाही. जेव्हा २०२४च्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी १५ दिवसांसाठी महायुती सरकारकडून संजय शिरसाटांना सिडकोचं चेअरमनपद देण्यात आलं. पद स्विकारल्यानंतर आल्या आल्या बँडबाजा आणि हारतुरे असं त्यांचं स्वागत करण्यात आलं. तिथं पहिल्याच बैठकीत शिरसाट यांनी बिवलकरांना ५ हजार कोटी रुपयांची जमीन देऊन टाकली. आता ती जमीन त्यांना देण्यासारखी आजिबात नव्हती, कारण त्याचा ताबा आणि मालकी ही शासनाची आहे.

५०-६० कोटींची घोटाळा?

या जमिनीतील गैरव्यवहाराविरोधात गेल्या सहा-सात महिन्यांपासून भूमिपुत्र इथं उपोषण करत आहेत. अनेक वर्षांपासून त्यांना न्याय मिळालेला नाही आणि इथं बिवलकरांनी पैशाचा केवळ हिरवा रंग दाखवला आणि तिथं लगेच सह्या झाल्या. यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असून केवळ ५ हजार कोटींवरच हा भ्रष्टाचार थांबेल असं वाटत नाही तर तो ५० ते ६० हजार कोटींवर जाईल.

कारण सरकारच्या नावावर असलेली जमीन ही ४ हजार एकरच्या आसपास आहे आणि याचा आकडा जर काढला तर तो खूप मोठा होतो. त्यामुळं शिरसाटांना राजीनामा द्यावाच लागेल. आता आम्ही जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत त्यांना पत्र देणार आहोत. जर आम्हाला आज सकारात्मक या सामान्य लकांच्या बाजून उत्तर नाही मिळालं तर गणेशोत्सावानंतर आम्ही खूप मोठा मोर्चा आम्ही तिथं काढणार आहोत, असा इशाराही यावेळी रोहित पवार यांनी दिला.

इतर मंत्र्यांनाही मिळाला वाटा?

सरकारमधील वरिष्ठ लोकांकडून शिरसाटांना सांगण्यात आलं आहे की, या प्रकरणावर काहीही बोलू नका जर बोललात तर आपण अडचणीत येऊ. त्यामुळेच कदाचित ते आत्ता बोलत नाहीत. ५ हजार कोटी सर्वच्या सर्व शिरसाटांना भेटले नसतील त्यातील १० टक्के जरी मिळाले असतील तरी ५०० कोटी होतात. छत्रपती संभाजी नगरमधील विट्स हॉटेल संजय शिरसाट ६० ते ७० कोटी रुपयांना विकत घ्यायला निघाले होते.

तसंच त्यांनी जमिनीही खूप घेतल्या आहेत, त्यामुळं या घोटाळ्यातून १०० ते दीडशे कोटी रुपये शिरसाटांना मिळाले असतील. म्हणजे सरकारचं नुकसान ५ हजार कोटींचं आणि या सर्व नेत्यांचा फायदा ५०० ते १००० कोटींचा शंभर टक्के झाला आहे आणि हाच पैसा आमच्याविरोधात निवडणुकीत म्हणजे लोकशाहीच्या विरोधात वापरला गेला असेल, असा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT