Sanjay Raut Angry On Datta Dalvi Arrest Case : Sarkarnama
मुंबई

Datta Dalvi Arrest Case : 'दत्ता दळवींनी आनंद दिघेंचा 'तो' शब्द वापरला; मग 'धर्मवीर'वर गुन्हा का नाही ?'

Sanjay Raut Angry On Datta Dalvi Arrest Case : "दत्ता दळवींच्या अटक प्रकरणात धर्मवीराची एन्ट्री.."

Chetan Zadpe

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून मुख्यमंत्र्यांना आक्षेपार्ह बोलणं ठाकरे गटाच्या नेत्याला चांगलेच भोवलं आहे. या प्रकरणी त्यांना आता अटक करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केली आहे. विक्रोळीतील राहत्या घरातून पोलिसांनी दळवी यांना ताब्यात घेतलं आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले असून, या अटकेला खासदार संजय राऊत यांनी विरोध केला आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी दत्ता दळवी यांचे संपूर्ण समर्थन करत म्हणाले, "दत्ता दळवी आपल्या भाषणामध्ये एक शब्द वापरला. ते म्हणाले की, आनंद दिघे असते तर गद्दार हृदयसम्राट यांना चाबकानं फोडून काढलं असतं. त्यांनी एक शब्द वापरला XXXचे, हाच शब्द धर्मवीर या चित्रपटात दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या तोंडी आहे. तो शब्द सेंसॉरने काढला नाही किंवा कापलेला नाही. जर का हा शब्द आक्षेपार्ह असेल तर चित्रपटाचे निर्माते, प्रायोजक, कलाकार यांच्यावरती गुन्हा दाखल केला का? तोच दिंघेंचा शब्द दत्ता दळवी यांनी वापरला तर त्यांना अटक कशी केली जाते?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून, ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत, आमदार सुनील राऊत, कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी भांडूप पोलिस ठाण्यासमोर जमले आहेत. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक विधान केलं, असा आरोप करत शिंदे गटाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार दळवींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रार दाखल -

भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडूप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वि कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणी भांडूप पोलिस अधिक तपास करत आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT