Sangli News : सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघातून 2014 ची निवडणूक लढविणारे काँग्रेस नेते सिद्धार्थ जाधव यांनी पक्षाला रामराम करून शिवसेनेच्या ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर आज (ता. २८ नोव्हेंबर) सिद्धार्थ जाधव हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. (Miraj's Congress leader Miraj Siddharth Jadhav will join Shiv Sena's Thackeray group)
आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून सिद्धार्थ जाधव यांनी ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस जवळ करणाऱ्या जाधव यांनी ठाकरे गटाचा रस्ता धरला. मात्र, त्याचा काँग्रेसवर किती परिणाम होतो, हे पाहावे लागेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सिद्धार्थ जाधव यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची 2014 ची निवडणूक मिरजमधून लढवली होती. त्यावेळी ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. पुढील २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसची ही जागा राष्ट्रवादी-स्वाभिमानीच्या वाट्याला गेली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे सिद्धार्थ जाधव हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सिद्धार्थ जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत.
मिरज विधानसभा मतदारसंघ हा राज्याचे कामगारमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच मतदारसंघातून पालकमंत्री खाडे यांनी आपले पुत्र सुशांत खाडे यांना राजकीय वारसा नेमण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दहीहंडी सोहळ्यात त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.
कामगार मंत्र्यांचे सुपुत्र सुशांत खाडे यांच्या विरोधात मंत्र्यांचे एकेकाळचे स्वीय सहायक मोहन व्हनखंडे उभे ठाकण्याची शक्यता आहे. भाजपची ताकद त्यांच्या पाठीमागे उभी आहे. अशा स्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणारे सिद्धार्थ जाधव यांचा निभाव लागणे कठीण मानले जात आहे. शिवाय पक्ष संघटन, कार्यकर्ते संघटनामध्ये कमी असलेल्या जाधव यांच्या पक्ष सोडण्याने काँग्रेसला काही फरक पडणार नसल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.