Mumbai : शिवसेना (ठाकरे गट) नेते भाजपवर वार करण्याची एकही संधी गमावत नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर संजय राऊत यांच्या टार्गेटवर असतात. देवेंद्र फडणवीस देखील राऊत यांना प्रत्युत्तर देतात. मात्र, एका प्रकरणात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून गंभीर आरोप केला आहे.
काही गंभीर तसेच संवेदनशील गुन्ह्यांतील हायप्रोफाईल आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी म्हणून एप्रिल २०२३ पासून डीएनए तपासणीसाठी लागणारे किट्स बहुतेक सर्व प्रयोगशाळेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे.
गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय येते. या प्रयोगशाळेतील डीएनएचा अहवाल हा विवादित पितृत्व चाचणी, खून, बलात्कार, पोस्को कायदा इत्यादींमध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जातो. मात्र, एप्रिल २०२३ पासून DNA साठी लागणारे किट्स बहुतेक सर्व प्रयोगशाळेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे, असे राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच या संचालनालयाला पूर्ण वेळ महासंचालक, न्यायिक व तांत्रिक तसेच संचालक असूनदेखील या गंभीर विषयाकडे लक्ष नसल्याचा पत्रात उल्लेख आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हायप्रोफाईल आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी म्हणून हा तुटवडा निर्माण करणे व त्यातून पुरावे नष्ट करण्याची ही योजना असल्याचे बोलले जाते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. परिणामी अनेक गुन्ह्यांच्या तपासामध्ये विलंब होत आहे. तपासामध्ये जप्त केलेला मुद्देमाल खराब होऊन त्यांचा गुन्हा सिध्दतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. या तक्रारीची दखल घेऊन यामध्ये दोषी असणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावर २२ डिसेंबरची तारीख आहे.तर, पोच म्हणून उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून २९ डिसेंबरचा शिक्का मारण्यात आलेला आहे. आता देवेंद्र फडणवीस या पत्रानंतर काय कारवाई करतात याची चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.