Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On India Alliance : कोण संजय निरुपम? राऊतांनी झिडकारले, जागावाटप दिल्लीतच...

Sanjay Raut On Sanjay Nirupam : 'जिंकलेल्या जागांवर चर्चा होऊ शकत नाही..'

Chetan Zadpe

Mumbai News : आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार, हे दिल्लीतच ठरणार आहे. जिंकलेल्या जागांवर चर्चा चर्चाच होऊ शकत नाही. ज्या जागांवर काँग्रेसची शक्ती आहे, तिथे काँग्रेस निवडणूक लढवेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये काँग्रेसच्या हायकमांडसोबत आघाडीतल्या जागांबाबत चर्चा होत आहे. जागांबाबत बोलणारे संजय निरुपम कोण आहेत? आम्ही थेट दिल्लीशी संवाद साधतो, असे म्हणत राऊतांनी निरुपम यांना झिडकारले. (Latest Marathi News)

आघाडीतील पक्षांमध्ये जिंकलेल्या जागांवर चर्चा होऊ शकत नाही, जिंकलेल्या जागा ज्याची त्यांची जिंकलेल्या जागा लढवतील. त्यामुळे शिवसेनेला 18 जागा मिळतील एवढे निश्चत आहे. शिवसेना आणखी पाच जागा मागणार आहे, मित्रपक्ष अन् वंचित बहुजन आघाडीसाठी शिवसेना प्रयत्न करेल, असे राऊतांनी सांगितले.

राहुल गांधी उत्तम पंतप्रधान होऊ शकतात -

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान होण्यासाठी सर्व गुण आहेत. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे चेहरा होऊ शकतात. पंतप्रधानपदासाठी आवश्यक सर्व गुण राहुल गांधी यांच्यामध्ये आपल्याला दिसतात, असे संजय राऊत म्हणाले.

संजय निरुपम काय म्हणाले होते ?

संजय राऊत हे 23 जागा लढवण्याचा आग्रह धरतात, त्यांनी एवढ्या जागा लढवल्या तर आम्ही काय करायचं? असा प्रश्न मुंबईतले काँग्रेस नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. वंचित बहुजन आघाडीनेही 12 जागांचे प्रस्ताव दिला आहे, असे मीडियातून समजले. एवढ्या जागांवर ते दावा करणार असतील, आघाडीतल्या इतर पक्षांनी काय करावं? असे संजय निरुपम म्हणाले होते.

(Edited BY - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT