Sanjay Raut: मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणूक येत्या काही महिन्यांत पार पडणार आहेत. या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा काँग्रेसचा मानस असल्याची चर्चा आहे. त्याच वरळी डोममध्ये पार पडलेल्या मराठीच्या विजयाच्या मेळाव्यात काँग्रेसच्या एकाही नेत्यानं हजेरी लावली नाही. यापार्श्वभूमीवर भाजपनं काँग्रेस अन् उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसला ठाकरे बंधुंनी मराठी विजयी मेळाव्यासाठी बोलवलंच नसेल. काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धव ठाकरेंसाठी संपलेला आहे. उद्धव ठाकरेंना वाटतं की राहुल गांधी हे कधीही देशाचं नेतृत्व करु शकत नाहीत. उद्धव ठाकरेंना वाटतं की राहुल गांधी हे आता सर्व स्तरावर फेल झालेले आहेत.
दरम्यान, बावनकुळेंच्या या विधानाला काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलंकी, मराठीच्या मेळाव्यात काँग्रेसला बोलावलं की नाही याची चिंता बानवकुळेंना का पडली? आमची चिंता बावनकुळे का करायला लागलेत? आता बावनकुळेंनी स्वतःची चिंता करावी. दोन बंधु एकत्र आल्यानंतर आता चिंताभारी त्यांना आहे. त्यामुळं ही चिंताभारी हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा. एकवेळा होणार नाही. त्यामुळं त्यांनी आमची चिंता करु नये, आम्ही का जाऊ नये? हे आमचं आम्ही ठरवू.
पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी भाजपच्या टीकेला सडतोड प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का? आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे. आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये, यासाठी या महाराष्ट्र काँग्रेसचे सर्व मराठी नेते या आंदोलनावर आमच्यासोबतच राहणार आहेत आणि आहेतच ते. त्यामुळं याची चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही.
मराठीच्या मुद्यावर आम्ही सर्वजण एक आहोत आणि एक राहू. काँग्रेस पक्षाचा या संदर्भातला अध्यादेश भाजपर्यंत आला असेल, पण आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. आमची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या काही बैठका दिल्लीला होत्या, प्रमुख नेते महाराष्ट्रात नव्हते एवढीच आमच्यापर्यंत माहिती आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.