Kadu VS Bawankule : बच्चू कडू आक्रमक पण चंद्रशेखर बावनकुळेंनी एका शब्दात विषय संपवला!

Farmers Loan Waiver Bacchu kadu Chandrashekhar Bawankule : बच्चू कडू यांनी आजपासून शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यासाठी अमरावती ते यवतमाळ अशी यात्रा सुरू केली.
Bacchu kadu Chandrashekhar Bawankule
Bacchu kadu Chandrashekhar Bawankulesarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule : माजी आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी यात्रा सुरू केली आहे. त्यापूर्वी ते उपोषणाला बसले होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आक्रमक झाले असातना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवघ्या एका शब्दांत बच्चू कडू यांचा विषयी संपवला.

'दुटप्पी' हा एकच शब्द बावनकुळे यांनी बच्चू कडूंसाठी वापरला. ते म्हणाले, महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. बच्चू कडू आणि आमचे मंत्री साडेचार तास मंत्रालयात बसून यावर चर्चा केली. अधिवेशनाच्या काळात ही समिती जाहीर करणार आहोत. याची संपूर्ण माहिती बच्चू कडू आहे. असे असताना ते वारंवार आंदोलनाचे हत्यार उपसून आणि महायुती सरकारवर आरोप करतात.

बच्चू कडू यांनी आजपासून (सोमवार) पुन्हा शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यासाठी अमरावती ते यवतमाळ अशी यात्रा सुरू केली. ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. महायुतीच्या सरकारमध्ये ते होते. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा आंदोलकाची भूमिका बजावणे सुरू केले आहे.

Bacchu kadu Chandrashekhar Bawankule
Imtiaz Jaleel News : एमआयएमकडून 'वंचित'ला पर्याय आझाद समाज पक्ष! इम्तियाज जलील यांच्या घरी झाली बैठक

बावनकुळेंचे आश्वासन अन् उपोषण स्थगित

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देत कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. त्यांची समजूत काढण्यासाठी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री या नात्याने चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवण्यात आले होते. मुख्यमंत्री एक समिती स्थापन करून योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर कडू यांनी उपोषणा स्थगिती केले होते.

बच्चू कडूंशी बोलणे झाले होते...

कर्जमाफीच्या आश्वासनासंदर्भात बच्चू कडू यांच्यासोबत बोलणे झाले. कर्जमाफीच्या संदर्भात समिती पावसाळी अधिवेशनात स्थापन केली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. सोबतच कर्जामाफीच्या संदर्भात तब्बल चार तास त्यांच्यासोबत चर्चा केली. कोणाला कर्जमाफी द्यायची, कशी द्यायची याबाबतही बोलणे झाले होते. असे असताना बच्चू कडू जर आंदोलन करीत असेल, महायुती सरकारवर आरोप करीत असतील तर त्यांना दुटप्पी असेच म्हणावे लागले.

...कर्जमाफी जाहीर केली जाईल

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात समिती स्थापन केली जाईल. महाराष्ट्राचा दौरा करून ही समिती शेतकऱ्यांसोबतच चर्चा करेल. त्यानंतर कर्जमाफी जाहीर केली जाईल. याची सर्व माहिती आपण बच्चू कडू यांना लेखी दिली आहे. कर्जमाफी करायची आहे हे सुद्धा सांगितले आहे. भाजप महायुती सरकारचीही हीच इच्छा आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प केला आहे आणि कर्जमाफी देणार असल्याचे कबूलही केले असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Bacchu kadu Chandrashekhar Bawankule
Dhule Congress : भाजपने झटका दिल्यानंतर धुळ्यात कॉंग्रेस अॅक्टीव मोडवर, राजकीय हालचालींना वेग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com