Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : देशाला 2014 पासूनच पनवती लागली; संजय राऊतांचा रोख कुणाकडे ?

Maharashtra Politics : हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या नेत्यांनी पनवती शब्दाचा अभ्यास करावा

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्यानेच भारत पराभूत झाला, अशी टीका करून काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींना पनवती असे संबोधित केले. यावरून देशाचे वातावरण तापले असताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनीही देशाला 2014 पासून पनवती लागल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील अनेक पनवती भाजपमध्ये दाखल होत आहेत, असेही ते म्हणाले. यामुळे महायुतीतील नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

2014 मध्ये काँग्रेसला उलथवून भाजपने सत्ता स्थापन केली. 2019 मध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत देशात सर्वात मोठा पक्ष झाला. दरम्यान, राहुल गांधींनी मोदींवर पनवती म्हणत केलेल्या टीकेची तक्रार निवडणूक आयोगात केली आहे. त्यानुसार गांधींना नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर राऊतांनी भाजपमुळे देशाला 2014 पासून पनवती लागल्याची टीका केली.

संजय राऊत म्हणाले, 'हिंदू राष्ट्रात पनवती या शब्दाचे अर्थ पाहूनच निवडणूक आयोगात जावे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या नेत्यांनी या शब्दाचा अभ्यास करावा. साडेसाती, पनवती याकडे गंभीरतेने पाहिले जाते. यानुसारच देशाला 2014 पासून लागलेली पनवती 2024 मध्ये संपणार,' असा दावाही राऊतांनी या वेळी केला. पनवती म्हणत राऊतांनी भाजपसह अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राऊतांनी राजस्थानमध्ये प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जागतिक, महान नेते असल्याचा टोलाही लगावला आहे. 'मुख्यमंत्री शिंदेंना प्रचार करू द्या, पुढच्या वर्षी अमेरिकेची निवडणूक आहे, त्यानंतर युरोपमधील सात राष्ट्रांमध्येही निवडणुका होणार आहेत. ते एवढे मजबूत नेते आहेत, त्यांना अमेरिकेत शिकागोमध्येही त्यांच्या सभा लावल्या जाणार आहेत. फ्रान्सची निवडणूक आहे, तिकडेदेखील त्यांना बोलावलं जाईल,' असा खोचक टोला राऊतांनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT