Chitra Wagh  Sarkarnama
मुंबई

Chitra Wagh : खोटारडी, ब्लॅकमेलर...; शरद पवार गट उद्या भाजपच्या चित्रा वाघांवर 'पेनड्राईव्ह' बॅाम्ब टाकणार!

Vidya Chavan : शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पेनड्राइव्ह दाखवत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे कारनामे उघड करण्याचा इशारा दिला आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यात सध्या पेनड्राईव्ह बॉम्ब पडत आहेत. आजी-माजी गृहमंत्र्यांमधील सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा पुरावा पेनड्राइव्हमध्येच आहे.

आता शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पेनड्राइव्ह दाखवत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे कारनामे उघड करण्याचा इशारा दिला आहे. चव्हाण यांनी उद्या मंगळवारी दुपारी पेनड्राईव्हमध्ये काय आहे ते सांगणार असल्याचेही स्पष्ट केले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांना चित्रा वाघ यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्ही जे काही गृहमंत्री फडणवीस यांच्याबाबतच्या आरोपांवर काही सादर केले तर आम्हीही सर्व पुरावे देण्यास सज्ज आहोत, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. त्याला विद्या चव्हाण यांनी वाघ यांना पेनड्राईव्हने उत्तर दिले आहे.

विद्या चव्हाण म्हणाल्या, बजेटमध्ये राज्याला भरभरून दिले अशा थापा तुम्ही मारल्या. आम्ही फेक नरेटीव्ह करतो असा आरोप करता. शरद पवार Sharad Pawar पित्रुतुल्य आहेत असे सांगता, आता त्याच पवारांना शरद अली म्हणता. राज्याला ज्या पत्रकारांनी, समाजसेवकांनी दिशा दिली, त्यांचा उल्लेख पोपट असा करता, असा आरोप केला आहे.

तुझ्यासारख्या खोटारड्या, बनेल, ब्लॅकमेलिंग करणारी, पक्षात मोठे पद मिळवण्यासाठी काहीही करू शकते, हे आम्ही जवळून पाहिले आहे, असा शब्दांत चव्हाण यांनी वाघ Chitra Wagh यांचा समाचार घेतला.

आम्ही विकासाची कामे करतो म्हणत फडणवीस काहीही करू शकतात याचा पाढाच वकिलांसमोर वाचला आहे. तो अनुभव मी घेतेय. हे खोटे वाटत असेल त्याबाबतचा हा पेनड्राईव्ह आहे. यात चित्रा वाघ काय-काय बोलते, काय-काय करते, तिचे कारनामे यात आहेत. हे कारनामे पाहायचे, ऐकायचे असतील तर उद्या दुपारी ३ वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात समजतील. तिचे कारनामे राज्यातील जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही विद्या चव्हाण Vidhya Chavan यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT