ठाण्यात भाजप विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. एकमेकांवर टीका करणारे नेते आता थेट गोळीबार करू लागले आहेत. शुक्रवारी कल्याण पूर्वमधील भाजपचे आमदार गणपत गायकवाड ( Ganpat Gaikwad ) यांनी उल्हासनगर शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. गणपत गायकवाडांनी महेश गायकवाडांवर सहा गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर एकच खळबळ उडली आहे. याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत शिंदे सरकारवर टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले, "कायदा हातात घेणाऱ्यांबद्दल मुक्तता किंवा मोकळीक असल्याचं पाहायला मिळत आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. त्यालाही मर्यादा आहेत. पण, गोळीबाराबाबत सरकार बघ्याची भूमिका घेत असेल, तर राज्य कुठल्या दिशेनं चाललं आहे, हे त्याचं उदाहरण आहे. अशा गोष्टी महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीनं चिंताजनक आहे."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारावार उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं आहे. "पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबाराचं सत्य आपल्याला काढावं लागेल, म्हणून वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. यासंदर्भात अत्यंत कडक कारवाई केली जाईल," असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
नेमकं काय घडलं?
उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड पोहोचले होते. त्यांच्यात जमिनीवरून वाद होता. गेल्या काही दिवसांपासून हा वाद विकोपाला गेला होता. शुक्रवारी याचपार्श्वभूमीवर गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड पोलीस ठाण्यात गेले होते. तिथेही हा वाद शमला नाही. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. महेश गायकवाड यांचा सहकारीही या गोळीबारात जखमी झाला आहे. सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
Edited By : Akshay Sabale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.