Balaji Kinikar, Eknath Shinde, Vishwanath Bhoir Sarkarnama
मुंबई

Shivsena Politics : अंतर्गत विरोधामुळे शिंदे गटातील 'या' आमदारांची उमेदवारी वेटिंगवर?

First list of Shiv Sena candidates : शिवसेनेच्या पहिल्या यादीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आणि अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे नाव या यादीत नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शर्मिला वाळुंज

Dombivli News, 23 Oct : विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. भाजप, मनसे आणि त्यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेने देखील उमेदवारांची यादी जाहीर केली.

मात्र, शिवसेने जाहीर केलेल्या यादीत काही विद्यमान आमदारांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ या मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

कल्याण (Kalyan) पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आणि अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे नाव या यादीत नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पक्षातील अंतर्गत विरोधामुळे या दोन्ही आमदारांची नावे वेटिंगवर ठेवण्यात आली आहे का?

याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. बालाजी किणीकर (Balaji Kinikar) हे अंबरनाथ मतदारसंघातून मागील सलग तीन टर्म आमदार आहेत. तर यंदा चौथ्या टर्मसाठी त्यांची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दुसऱ्या टर्मसाठी तयारी केली आहे.

शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर सुरत मार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या सुरुवातीच्या आमदारांमध्येही विश्वनाथ भोईर आणि बालाजी किणीकर यांचा समावेश होता. पक्षाचं खजिनदार पद देखील बालाजी किणीकर यांच्याकडेच आहे. त्यामुळे पहिल्याच यादीतच या आमदारांची उमेदवारी जाहीर अशी शक्यता होती.

मात्र, त्यांची नावे पहिल्या यादीतून वगळली आहेत. तर बालाजी किणीकर यांना त्यांच्याच पक्षातील एका गटाचा विरोध असून त्यांना उमेदवारी दिल्यास काम न करण्याची भूमिका या गटाने घेतली आहे. कदाचित त्यामुळेच किणीकर यांचं नाव पहिल्या यादीत आलं नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

दरम्यान, आमदार विश्वनाथ भोईर यांना त्याच्याच पक्षातून आव्हान मिळताना दिसत आहे, कल्याणमधील शिंदेच्या सेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी सभागृहनेता रवी पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयारी केली असून त्यानी स्वतःचा प्रचारही सुरू केला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार कल्याणमधून निवडणूक लढण्यासं इच्छुक असल्यामुळे भोईर यांची उमेदवारी वेटिंगवर असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT