Bhaskar Jadhav Sarkarnama
मुंबई

Bhaskar Jadhav : आमदार जाधवांचा वेगळाच राजकीय मूड, पुत्रप्रेमाखातर घेणार मोठा निर्णय

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार भास्कर जाधव सध्या वेगळ्याच राजकीय मूडमध्ये आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा त्यांचे पुत्र विक्रांत जाधव याला सोडून ते चिपळूण मधून विधानसभा निवडणूल लढण्याच्या तयारीत आहेत.

अर्थात, भास्कर जाधव यांनी याबाबत उघड भूमिका जाहीर केली नसली, तरी त्यांची चाचपणी चिपळूण मधून सुरू असल्याचे हे लपून राहिलेले नाही. भास्कर जाधव यांच्या या भूमिकेची शिवसेना ठाकरे पक्षात देखील चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 21 निरीक्षकांमार्फत विधानसभा निवडणुकीची चाचपणी करून घेतली. विधानसभा मतदारसंघनिहाय अहवाल मागवला. यावर थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता निर्णय घेणार आहे. गुहानर आणि चिपळूण मतदारसंघाबाबत भास्कर जाधव यांच्याकडून सुरू असलेल्या चाचपणीची चर्चा आहे. आमदार मिलिंद नार्वेकर यांचा निरीक्षक म्हणून कोकणचा दौरा झाला. आमदार जाधव यांनी नार्वेकर यांच्यासमोर गुहानर आणि चिपळूण मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

भास्कर जाधव गुहानगरचे आमदार आहेत. या मतदारसंघातून सलग तीन वेळा त्यांनी विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुहानगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (Shiv Sena) ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांना 27 हजारांचे मताधिक्य मिळवून दिले. यावरून गुहागरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाची ताकद दिसते. महाविकास आघाडी देखील गुहागरमध्ये एकसंघ आहे. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांचा चिपळूणमध्ये पराभव झाला होता. यानंतर चिपळूणमध्ये सलग दोन वेळा विजय झाले होते.

भास्कर जाधव यांचा तिसऱ्यावेळी चिपळूणमध्ये पराभव झाला होता, तो डाग आता त्यांना पुसायचा आहे. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे त्यांना बळ हवे आहेत. भास्कर जाधव यांनी ही इच्छा पूर्ण करताना पुत्रप्रेम देखील साधत असल्याची चर्चा आहे. भास्कर जाधव यांचा पुत्र विक्रांतसाठी गुहानर मतदारसंघात चाचपणी सुरू आहे. ही चाचपणी आता लपून राहिली नसून, त्यावर चर्चा सुरू झाली आहे. शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर राज्यात निर्माण झालेली परिस्थिती भास्कर जाधव यांना चिपळूणमधून जिंकण्यासाठी तसेच गुहानरमधून मुलगा विक्रांत याला आमदार बनवण्यासाठी अनुकूल वाटते. त्यामुळे भास्कर जाधव ही मोठी चाचपणी करत असल्याचे बोलले जात आहे.

भास्कर जाधव यांनी ही भूमिका अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. पण ती लपून देखील राहिलेली नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांना निरीक्षक म्हणून कोकण दौऱ्यावर पाठवले होते. त्यावेळी भास्कर जाधव यांनी गुहानगर आणि चिपळूण जागेबाबत नार्वेकर यांच्याशी खासगीत संवाद साधल्याचे पुढे येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT