Hoarding in Mumbai Sarkarnama
मुंबई

Shiv Sena MLA Disqualificaiton Verdict : निकाल लागले अन् होर्डिंग्जना वाचा फुटली...

सरकारनामा न्युज ब्युरो

जुई जाधव

Mumbai Political News :

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेना (ShivSena) आमदार अपात्रतेप्रकरणी (ShivSena MLA Disqualificaiton Verdict) काल (१० जानेवारी) मोठा निकाल दिला. या निकालावर कालपासून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक नेत्यांनी राहुल नार्वेकरांवर तोंडसुख घेतले, तर अनेकांनी निकालाचे स्वागत केले. या सर्व पार्श्वभूमीवर आता मुंबईत बॅनर लागले आहेत. आता मुंबईत ठिकठिकाणी महाविकास आघाडीने लावलेले होर्डिंग्ज महत्त्वाचे भाष्य करीत आहेत.

कालचा निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्याविरोधात गेल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्ष ठाकरेंसोबत उभे राहिले आहेत. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि इतर नेत्यांनीही उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पाठिंबा देत निकालावर कडवट टीका केली आहे. शिवाय त्याचे मोठे होर्डिंग्ज मुंबईत झळकत आहेत.

आज दिवसाढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली अन् लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली! अब न्याय जनता करेगी, असा आशय या होर्डिंग्जवर आहे. मुंबईत जसे होर्डिंग्ज लागले आहेत, तसे राज्यभरात लागण्याची शक्यता आहे.

विधानसभाध्यक्ष नार्वेकरांच्या निकालामुळे उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीत वाढ झाली आहे. विरोधक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. मुंबईप्रमाणे ठाण्यातही निकालाविरोधात होर्डिंग्ज लागल्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाढत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यात दोन मोठ्या पक्षात बंडखोरी झाली. यामुळे यंदाच्या निवडणुका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. देशात आणि राज्यात भाजपने हुकूमशाही सुरू केली आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. म्हणूनच याविरोधात महाविकास आघाडीने भाजपच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

विरोधकांकडून निकालाचा निषेध

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निकाल लागल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदींनी राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले, तसेच उद्धव ठाकरेंनी या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचाही सल्ला दिला.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT