Sushma Andhare  Sarkarnama
मुंबई

Sushma Andhare Allegations : एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची गुंडागर्दी; 'आका' कोण? सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप

Shiv Sena Thackeray Leader Sushma Andhare Allegations: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे डीसीएम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना ठाणे जिल्ह्यातील नेत्यावर गंभीर आरोप केला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील गुंडागर्दीवरून गंभीर आरोप केले आहे.

राजकारण अन् गुडं, असे समीकरण झाल्याची शंका उपस्थित करून, ठाण्यातील शिंदेंचा बडा नेता स्वप्नील शेडगे याच्या गुंडागर्दीला आशीर्वाद देत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे. एका युवकावर शस्त्राने हल्ला चढवला असताना देखील ठाण्यातील हा शिंदे नेता या आरोपीला पाठिशी घालत आहे, असे सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

स्वप्नील शेडगे हा शिवसेना (Shivsena) युवासेनेचा ठाण्यातील पदाधिकारी आहे. त्याने 30 ते 35 मुलांना घेऊन तुषार जाधव उर्फ जयेश, त्याचा भाऊ विशाल जाधव आणि अविनाश जाधव यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला.

यात जयेश जाधव याला गंभीर जखमी करुण 50 टाके पडले. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या जखमी जयेश जाधव याला स्वप्निल शेडगे याने पोलिसाच्या (Police) उपस्थितीत धमकावले. माझ्याकडे 100 मुले आहेत, त्यांना प्रत्येकी एक-एक लाख रुपये देऊन 13 मे रोजीच्या आधी तुम्हाला संपवणार, असल्याची धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे केला आहे.

या धमकीचे सीसीटीव्ही चित्रीकरण असून वर्तकनगर पोलिस ठाण्यामध्ये फिर्यादीनंतर देखील वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाकचौरै यांना झालेल्या लक्ष्मी प्रसादाने आणि पोलिसांच्या वरदहस्ताने आरोपी मोकाट फिरत होता. पोलिस अधिकारी चिंतामणी व वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या संपर्कात आरोपी असून, देखील अटक केली नाही, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

लॅाकअपमधून अधिकाऱ्यांना फोन

गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट क्रमांक पाचने आरोपीला अटक केली. त्यानंतर देखील अटक केलेल्या आरोपीची पोलिस ठाण्यात प्रचंड बडदास्त ठेवली. मंत्रीपुत्राने घरून जेवणाचे डबे पुरवले जात असल्याची माहिती मिळते. हे कमी होते म्हणून की काय, आरोपी लॅाकअपमधून आरटीओ अधिकाऱ्यांना फोन करून पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केला.

सीसीटीव्ही बंद

आरोपीची कारागृहात रवानगी होताच, मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आले होते. आरोपीला जिथं ठेवण्यात आले आहे, तिथले सीसीटीव्ही बंद करण्यात आलेले असून आरोपीचा बिनधास्त वावरत आहे, असे देखील सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

'आका' कोण?

आरोपीला भेटण्यासाठी गुंडांच्या रांगा जिल्हा रुग्णालयात लागल्या असून, आरोपी बिनधास्त फोनवर बोलतो आहे. मी सगळ्यांना पैसे दिले आहेत. कुणी माझे काही बिघडू शकत नाही. अशा वल्गना करत आहे. ठाण्यात जणू कायदा आणि सुव्यवस्थाच शिल्लक राहिलेली नाही. या गुंड स्वप्नील शेडगेचा नेमका 'आका' कोण आहे, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT