Rashmi Shukla News Sarkarnama
मुंबई

Rashmi Shukla New DGP? : रश्मी शुक्लांविरोधात शिवसेना आक्रमक; पोलिस महासंचालक झाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा

Sanjay Raut News : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंगचे आरोप होते.

Vijaykumar Dudhale

Mumbai News : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी वादगस्त अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या निवडीची गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मात्र त्याबाबत अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, सरकारने जर रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी निवड केली तर त्या निवडीविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. (Shiv Sena will go to court if Rashmi Shukla is elected as Director General of Police : Sanjay Raut)

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंगचे आरोप होते. मात्र, सरकारने त्यांना क्लीन चिट दिली असून, राज्याच्या पोलिस महासंचालक म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तसे ट्विटही केले होते. मात्र, तासाभरातच त्यांनी ते ट्विट डिलिट केले होते. महाविकास आघाडी तथा शिवसेना या नियुक्तीच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच संजय राऊतांनी शुक्लांची नियुक्ती झाली तर कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

राऊत म्हणाले की, फोन टॅपिंगचे आरोप असणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नेमता का? मी त्यातला बळी आहे. माझा, नाना पटोले यांचा फोन खोटे षडयंत्र करून टॅप झालेला आहे. त्यामुळे त्यांची निवड झाल्यास मी त्याविरोधात न्यायालयात जाणार आहे. अशा व्यक्तीला तुम्ही पोलिस महासंचालक नेमता. माझं कुणाशी व्यक्तिगत भांडण नाही, पण माझं पोलिसांना आवाहन आहे की, तुम्हाला २०२४ मध्ये या सर्व खोट्या गुन्ह्यांचे उत्तर द्यावे लागेल.

आमचे फोन टॅप झालेले होते, त्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले. नाना पटोले, माझा फोन टॅप झालेला आहे. उद्धव ठाकरे यांचाही फोन टॅप करण्याचा प्रयत्न झाला. अशा पोलिसांकडून कोणत्या निष्पक्ष कामाची अपेक्षा करणार आहात, असा सवालही राऊतांन या वेळी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT